ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
सावरकर समजून घेतल्यास भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक प्रभावीपणे जाणू शकू : वैशाली पंडित
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सावरकर समजून घेतल्यास भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक प्रभावीपणे जाणू शकू : वैशाली पंडित

सावरकर समजून घेतल्यास भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक प्रभावीपणे जाणू शकू : वैशाली पंडित

Article image

गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान शिरोडा संचलित गुरुवर्य अ. वि. बावडेकर विद्यालयात ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांच्या 'कालजयी मृत्युंजयी सावरकर' विषयावरील व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद. 

Article image

गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी आमदार शंकरभाई कांबळी, शिरोडा केंद्रबल गटाचे नवनिर्वाचित केंद्रप्रमुख भूषण नाईक, त्रिंबक आजगावकर, देवयानी आजगावकर, पर्यवेक्षिका नीलम कांबळे, संस्था पदाधिकारी यांची उपस्थिती.


मळगांव | नितिन गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातल्या गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान शिरोडा संचलित गुरुवर्य अ. वि. बावडेकर विद्यालयात 'कालजयी मृत्युंजयी सावरकर' या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक व निवृत्त शिक्षिका वैशाली पंडित यांचा व्याख्यान कार्यक्रम संपन्न झाला. शनिवार, ०१ ऑगस्ट २०२६ रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्त्या ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित, गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी आमदार शंकरभाई कांबळी, शिरोडा केंद्रबल गटाचे नवनिर्वाचित केंद्रप्रमुख भूषण नाईक, त्रिंबक आजगावकर, देवयानी आजगावकर, पर्यवेक्षिका नीलम कांबळे, संस्था पदाधिकारी श्री. महाले, विश्वास वाघाटे आदी मान्यवर उपस्थित होते. 

Article image


कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच ज्येष्ठ साहित्यिक व प्रमुख वक्त्या वैशाली पंडित यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मरणिका देऊन सत्कार करण्यात आला. 

Article image

यावेळी वक्त्या साहित्यिक वैशाली पंडित यांनी 'कालजयी मृत्युंजयी सावरकर' या विषयावर मार्गदर्शन करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रभक्ती, क्रांतिकारी विचारसरणी, सामाजिक सुधारणांसाठीचे कार्य, साहित्यसंपदा, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन अशा विविध पैलूंचा सविस्तर आढावा घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकर हे लोकमान्य टिळक यांचे शिष्य होते. गुरु आणि शिष्य या दोघांच्याही स्वभावात निर्भीडपणा व राष्ट्रप्रेमाची समान छाप होती. लोकमान्य टिळक यांना अंदमानमधील मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षे ठेवण्यात आले तेव्हा त्यांनी 'गीतारहस्य' ग्रंथ लिहिला त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना 'कमला' काव्य लिहिले. ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी परदेशी कापडांची होळी, स्वदेशीचा पुरस्कार, अभिनव भारत संघटनेची स्थापना, १८५७ च्या स्वातंत्र्यसमराला स्वातंत्र्ययुद्धाचा दर्जा देणारे संशोधन तसेच समाजातील जातिभेद यांचा विशेष उल्लेख त्यांनी केला. सावरकर समजून घेतल्यास भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक प्रभावीपणे जाणू शकू असे सांगितले.

Article image

तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तान्ह्या मुलाचे निधन झाल्याची बातमी त्यांना परदेशात समजली तेव्हा ब्रायटनच्या समुद्रकिनाऱ्यावर 'ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला' हे अजरामर गीत त्यांनी रचले होते. फ्रान्समधील मार्सेलीस बंदरात जहाजातून घेतलेली त्यांची ऐतिहासिक उडी ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अद्वितीय घटना ठरली. त्यावेळी "स्वातंत्र्यदेवतेचा विजय असो!" अशी गर्जना करत त्यांनी ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान दिले होते, असे प्रतिपादन साहित्यिक वैशाली पंडित यांनी केले. 


अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्था अध्यक्ष तथा माजी आमदार शंकरभाई कांबळी यांनी, वैशाली पंडित यांचा 'कालजयी मृत्युंजयी सावरकर' असा कार्यक्रम प्रथमच ऐकला असे विशेष नमूद केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांविषयी एवढी माहिती कणखर भाषेत सांगितल्याबद्दल त्यांनी वैशाली पंडित यांचे कौतुक केले. यावेळी शिरोडा केंद्रप्रमुख भूषण नाईक, मुक्ताई पणशीकर, श्रीम. वालावलकर, श्रीम. शिरोडकर यांनी मनोगत व्यक्त केले. 

Article image

Article image

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलम कांबळे यांनी केले व श्रीराम दीक्षित यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश राठ्ये यांनी केले तर राजेश आव्हाड यांनी आभार मानले. यावेळी अ. वि. बावडेकर विद्यालय व बा. म. गोगटे कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे या...

06 Sep 2026 517

लोकप्रिय टॅग्स