डाॅ. शिरीष कदम यांना गुलजारी लाल नंदा पुरस्कार जाहीर.
डाॅ. शिरीष कदम यांना गुलजारी लाल नंदा पुरस्कार जाहीर.
महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशन प्रदेशाध्यक्ष विजय आप्पा पंडित यांची माहिती.
रेडिऑलाॅजिस्ट डाॅ. शिरीष कदम, मुंबई ( संस्थापक : स्पीड फाऊंडेशन
नाशिक : मुंबई येथील सुप्रसिद्ध रेडिऑलाॅजिस्ट तसेच मालवणच्या सुप्रसिद्ध टोपीवाला हायस्कूल प्रशालेचे माजी विद्यार्थी डाॅ. शिरीष रमाकांत कदम यांची 'गुलजारी लाल नंदा' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशनच्या वतीने यंदा विशेष पुरस्कार प्रदान केले जात असून याबद्दल प्रदेशाध्यक्ष विजय आप्पा पंडित आणि सचिव राजेंद्र नगरकर यांनी महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशन तसेच सकल नाभिक समाज बांधवांच्या वतीने विशेष माहिती दिली आहे. एकंदर १२ विविध राज्यातील तसेच विविध क्षेत्रात सातत्यपूर्ण समाजोपयोगी योगदान दिलेल्या व्यक्तींची या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. 'नाशिक पंचवटी" येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती श्री. विजय आप्पा पंडित यांनी दिली आहे.
या पुरस्कारा अंतर्गत मुंबई येथील सुप्रसिद्ध रेडिऑलाॅजिस्ट तसेच मालवणच्या सुप्रसिद्ध टोपीवाला हायस्कूल प्रशालेचे माजी विद्यार्थी डाॅ. शिरीष रमाकांत कदम यांची 'गुलजारी लाल नंदा' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून त्यांचे मुंबई सह सिंधुदुर्ग जिल्हा व मालवणच्या विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
श्री. विजय आप्पा पंडित ( प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशन)
महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशन प्रदेशाध्यक्ष विजय आप्पा पंडित यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की संघटनेच्या निवड समितीच्या मार्गदर्शनाखाली, संघटनेच्या माध्यमातून गेली काही वर्षे देशभरातील विविध व्यक्तींच्या कामांचा अभ्यास केला गेला आहे. त्यानुसार समाजात तळमळीने योगदान देत असलेल्या विविध १२ राज्यातल्या विविध क्षेत्रात झटत असलेल्या मान्यवरांची या पुरस्कारासाठी दखल घेतली गेली आहे. महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशन व सकल नाभिक समाज हे महाराष्ट्र राज्य आणि देशातील नागरीकांच्या सर्वांगीण एकत्रित वाटचालीसाठी उपयुक्त अशा प्रेरक व्यक्तिमत्वांना नेहमीच गौरवपर प्रोत्साहन देत असल्याचेही श्री. विजय आप्पा पंडित यांनी सांगितले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)