ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मालवणात बीएमडी तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणात बीएमडी तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

मालवणात बीएमडी तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. 

Article image

लिमये हॉस्पिटल व रोटरी क्लब ऑफ मालवण यांचे संयुक्त आयोजन.


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण रोटरी क्लब आणि लिमये हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने 'लिमये हॉस्पिटल, मालवण' येथे Bone Mineral Density (BMD) तपासणीचे शिबिर संपन्न झाले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून दिवसभरात एकूण १५५ रुग्णांची मोफत बीएमडी तपासणी करण्यात आली. रोटरी क्लब मालवणच्या अध्यक्षा सौ. नीलम जोशी आणि सचिव सौ. प्रविणा शिंदे यांनी नियोजन व समन्वयाची जबाबदारी सांभाळून शिबिराच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रो. डॉ. लीना लिमये व डॉ. अजित लिमये यांच्यासह प्रदीप सामंत, महादेव पाटकर, अभय कदम, रमाकांत वाक्कर, अमरजीत वणकुद्रे यांनी परिश्रम घेतले.




हाडांच्या ठिसूळपणाचे (ऑस्टिओपोरोसिस) लवकर निदान व्हावे आणि नागरिकांमध्ये हाडांच्या आरोग्याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तपासणीनंतर प्रत्येक रुग्णाला त्यांचा बीएमडी तपासणी अहवाल त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्याची सुविधा देण्यात आली, त्यामुळे रुग्णांना भविष्यातही त्यांचा अहवाल सहज पाहता येणार आहे.


या शिबिरात ज्या रुग्णांच्या बीएमडी तपासणीचे निष्कर्ष सकारात्मक (Positive) आले, अशा रुग्णांना डॉ. अजित लिमये यांनी आवश्यक औषधोपचार, आहार, व्यायाम तसेच पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स