ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
भाजप प्रदेश सचिव डाॅ.निलेश राणेंच्या हस्ते मिस टुरीझम युनिव्हर्स श्रीया परब हिचा कांदळगांव येथे सत्कार…!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भाजप प्रदेश सचिव डाॅ.निलेश राणेंच्या हस्ते मिस टुरीझम युनिव्हर्स श्रीया परब हिचा कांदळगांव येथे सत्कार…!

प्रकाशन: 05 Nov 2021 06:48 PM
वाचन संख्या 102

श्रीया परब व कुटुंबाच्या पाठीशी भावासारखे खंबीर रहाणार असल्याची माजी खासदारांनी व्यक्त केली भावना..

डाॅ.निलेश राणेंनी कांदळगांवच्या श्री देव रामेश्वर मंदिरालाही दिली भेट…

मालवण | वैभव माणगांवकर : नुकत्याच लेबनान येथे २२ देशांच्या सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयोजित मिस टुरीझम युनिव्हर्स २०२१ स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या भारताच्या श्रीया संजय परब हिचा कांदळगाव या मूळगावी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते नागरी सन्मान करण्यात आला. श्रीया परब यांना विशेष मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांनी पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्गला ओळख दिली. त्याच सिंधुदुर्गमधील श्री देव रामेश्वर कांदळगाव भूमीतील श्रीया परब ‘मिस टुरीझम’ युनिव्हर्स आशिया २०२१ हा बहुमान मिळवते ही बाब सिंधुदुर्गवासीयांसाठी अभिमानास्पद आहे. श्रीया हिची जागतिक स्तरावरील यशाची पताका अशीच फडकत रहावी. एक भाऊ या नात्याने श्रीया व तिच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीर उभा असेन. असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला.
लक्ष्मीपूजन उत्सव समिती कांदळगाव, श्री देव रामेश्वर देवस्थान कांदळगाव, ग्रामपंचायत कांदळगाव व कांदळगाव ग्रामस्थ यांच्या वतीने मिस टुरीझम युनिव्हर्स आशिया २०२१ विजेत्या श्रिया संजय परब हिचा भव्य नागरी सन्मान भाजप नेते निलेश राणे यांच्या हस्ते कांदळगाव श्री देव रामेश्वर मंदिर येथे करण्यात आला.
यावेळी रामेश्वर देवस्थान अध्यक्ष शिवराम परब, सचिव उदय राणे, सरपंच उमदी परब, लक्ष्मीपूजन उत्सव समिती अध्यक्ष शामसुंदर मुळये, उमेश कोदे, उपसरपंच आंनद आयकर, सदस्य अक्षता परब, मनोज आचरेकर, भाग्यश्री डिचोलकर, राजेश कांदळगावकर, अर्चना कोदे, पोलीस पाटील शीतल परब, आशु आचरेकर यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यासह भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, सभापती अजिंक्य पाताडे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाबा परब, चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे आदी उपस्थित होते.
भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी श्री देव रामेश्वराचेही दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांनिही डाॅ.निलेश राणे यांना सदिच्छा दिल्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स