किर्लोस येथे कृषी कन्यांचा 'पोलिओ लसीकरण' मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग.
किर्लोस येथे कृषी कन्यांचा 'पोलिओ लसीकरण' मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या किर्लोस येथे,२८ जून २०२६ रोजी 'राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत' पोलिओ लसीकरण कार्यक्रमात छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस - ओरसच्या कृषी कन्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
किर्लोस अंगणवाडी येथे संपन्न झालेल्या ह्या उपक्रमात, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिद्धेश भेंडे, उपप्राचार्य लेफ्टनंट विवेक राणे आणि शिक्षण विभाग प्रमुख विवेक खरात यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कन्या प्रिया पाटील, स्नेहल जगताप, पर्णिका जाधव यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमाला किर्लोस सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने लहान मुलांना पोलिओचे दोन थेंब देऊन त्यांचे लसीकरण करण्यात आले. या मोहिमेद्वारे पालकांमध्ये पोलिओ प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली तसेच पाच वर्षांखालील प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ लस पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला. ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी आणि कृषी कन्या यांच्या संयुक्त सहभागामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)