ताज्या बातम्या
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा १९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौरा. 'वर्ल्ड फार्मासिस्ट डे सेलिब्रेशन'मध्ये विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवलचे दुहेरी यश. देवगडसमोर बेकायदा मासेमारी करणारा कर्नाटकचा हायस्पीड ट्राॅलर जप्त. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन मालवण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेत साजरा. तळकटमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. सिंधुदुर्ग ( चिपी) - नवी मुंबई दरम्यानच्या दैनंदिन विमानसेवेमुळे पर्यटन आणि रोजगाराची नवी दालने खुली : पालकमंत्री नितेश राणे समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागाची २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी जनसुनावणी. 'लास्ट उन्स डॉयच लर्नेन...!' मुणगेतील कातकरी वस्तीमध्ये देवगड मंडल भाजपाच्या वतीने 'पाडावरची दिवाळी २०२६' कार्यक्रम संपन्न. मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांच्या वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात आमदार निलेश राणे यांचा सहभाग.

जाहिरात

नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामिनावरील स्थगिती कायम.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)

नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामिनावरील स्थगिती कायम.

Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)

नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामिनावरील स्थगिती कायम. 

Article image


ॲड. श्रीराम धोंडू चिंदरकर यांनी फिर्यादीं तर्फे मांडली बाजू. 



मुंबई | प्रतिनिधी : शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामिनावरील स्थगिती कायम राहीली आहे अशी माहिती मिळत असून, आरोपींकडून स्थगिती उठविण्याची मागणी उच्च न्यायालयाकडून नामंजूर करण्यात आल्याचे समजते आहे. आरोपींची ओळख परेड होत नाही तोपर्यंत स्थगिती उठवता येणार नाही अशी भूमिका फिर्यादीं तर्फे ॲड. श्रीराम धोंडू चिंदरकर यांनी मांडली. 


ह्या प्रकरणाची सुनावणीची प्रक्रिया, ३१ जुलै २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयात कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे तथा श्री. न्यायमूर्ती गौतम ए. अंखड यांच्या खंडपीठासमोर करण्यात आली. सुनावणीदरम्यान फिर्यादी डॉ. वैभव साळुंखे यांच्या वतीने जोरदार विरोध करण्यात आला. फिर्यादीच्या वतीने ॲड. श्रीराम चिंदरकर, ॲड. विवेक निशाद, अभिनय रविंद्र अडसूळ यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. फिर्यादीतर्फे बाजू मांडताना फिर्यादीचे वकील यांनी सांगितले आरोपींची ओळख परेड होत नाही तोपर्यंत जामिनावरील स्थगिती उठवता येणार नाही. तसेच फिर्यादी मूळ गावी वाशिम येथे राहत असल्यामुळे त्यांना आरोपींच्या ओळख परेड साठी पोलीस संरक्षणा सहित मुंबई येथे आणावे व परत मूळ गावी नेऊन सोडावे अशी मागणी करण्यात आली.


फिर्यादीच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले की, संबंधित घटना घडत असताना फिर्यादीने केलेली व्हॉइस रेकॉर्डिंग्ज तसेच त्या रेकॉर्डिंग्जचे लिखित ट्रान्सक्रिप्शन न्यायालयात पुरावा म्हणून दाखल करण्यात आले आहे. या पुराव्यांमधून फिर्यादीच्या जीवितास गंभीर धोका असल्याचा मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात आला.


याशिवाय, प्रकरणातील ओळख परेड (Test Identification Parade) तसेच इतर अनेक महत्त्वपूर्ण तपासाच्या प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेल्या नसल्याचा मुद्दाही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. तपास यंत्रणेकडून अद्याप महत्त्वाचे तपासकार्य सुरू असल्याने आणि प्रकरणातील तपास पूर्ण होणे बाकी असल्याने आरोपीच्या जामिनावरील स्थगिती कायम ठेवणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद फिर्यादीच्या वतीने करण्यात आला.


दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने आरोपींच्या वतीने करण्यात आलेली जामिनावरील स्थगिती उठविण्याची मागणी नाकारत नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामिनावरील स्थगिती कायम ठेवली. तसेच फिर्यादी डॉक्टर साळुंखे यांना पोलीस संरक्षणासहित ओळख परेड साठी मुंबई येथे आणण्याचे व परत मूळ गावी नेऊन सोडण्याचे आदेश दिले.


दरम्यान, प्रकरणातील तपास अद्याप सुरू असून महत्त्वाच्या तपास प्रक्रिया पूर्ण होणे बाकी असल्याने न्यायालयाने आरोपीच्या जामिनावरील स्थगिती कायम ठेवत प्रकरणाची पुढील सुनावणी दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी निश्चित केली आहे.


रमेश म्हात्रे प्रकरणातील हा आदेश फिर्यादीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच प्रलंबित तपासाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानला जात असून, पुढील सुनावणीकडे राज्यभरातील कायदे वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन मालवण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेत साजरा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन मालवण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेत साजरा.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळ...

17 Nov 2026 410
मालवणात आमदार निलेश राणे यांच्या प्राप्त निधीतून विद्युत ट्रान्सफॉर्मरचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते लोकार्पण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

मालवणात आमदार निलेश राणे यांच्या प्राप्त निधीतून विद्युत ट्रान्सफॉर्मरचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते लोकार्पण.

मालवणात आमदार निलेश राणे यांच्या प्राप्त निध...

09 Nov 2026 417
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार निलेश राणे यांचे अभिवादन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार निलेश राणे यांचे अभिवादन.

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण...

09 Nov 2026 233

लोकप्रिय टॅग्स