खोटले येथे गुरुपौर्णिमा सोहळा भक्तीभावात साजरा.
खोटले येथे गुरुपौर्णिमा सोहळा भक्तीभावात साजरा.
मसुरे | प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान (पादुका मठ)श्री क्षेत्र खोटले येथे मोठया संख्येने भविकांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा सोहळा, २९ जुलै २०२६ रोजी साजरा झाला. त्यानिमित्त सकाळी पादुका अभिषेक, शोडशोपचारे पूजा संपन्न झाली. संध्याकाळी हभप श्री विजय परब यांनी हरिपाठ आणि श्री स्वामी सुत महाराज विरचित स्वामी पाठात अनेक भाविकांचा सहभाग होता.
रात्री ८ वाजता श्री. जैन सातेरी प्रा. भजन मंडळ, वालावल (बुवा भूषण घाडी आणि सहकारी) यांचाङभजनाचा कार्यक्रम सादर केला. रात्री १०वा. श्री माऊली प्रा. महिला भजन मंडळ, हेदूळ गायिका कु. वैष्णवी सचिन शेमडकर यांनी स्वामी भजनाचे सादरीकरण केले.
दुपारी १ ते रात्री १०. ३० पर्यंत महाप्रसाद सेवा संपन्न झाली.
मठाधिपती गणेश घाडीगावकर यांच्या मार्गदर्शनाद्वारे श्रद्धास्थान उत्सव समिती यांच्या सोहळ्यासाठीच्या आयोजनाची भाविकांकडून प्रशंसा करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)