पेंडूर येथील प्रशालेत गुरूपोर्णिमा व मातृ - पितृ पूजन कार्यक्रम संपन्न.
पेंडूर येथील प्रशालेत गुरूपोर्णिमा व मातृ - पितृ पूजन कार्यक्रम संपन्न.
ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातल्या पेंडूर येथील पेंढर्याचीवाडी प्रशालेत गुरू पौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रशालेच्या वतीने, विद्यार्थी वर्गाला गुरू व पालक यांची महती समजावून सांगण्यात आली. विद्यार्थ्यांकडून सर्व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करून आणि मातृ-पितृ पूजनाद्वारे आपल्या आई - वडिलांप्रती आदर, प्रेम व ऋणनिर्देश व्यक्त केले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक समीर तेंडोलकर यांच्यासह शिक्षक गडदे, शिक्षिका सोनवणे तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांच्या वतीने दूर्वा सावंत, रेशमा साटेलकर, प्रांजल हरमलकर, समीक्षा बरकुटे, स्मिता चव्हाण, रत्नप्रभा गावडे, साक्षी जळवी, प्रशांत निरवडेकर आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक समीर तेंडोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांच्या सहयोगाने संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची पालकांकडून प्रशंसा करण्यात आली. प्रशालेच्या वतीने कार्यक्रमासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)