ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न.

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न.


आरोग्य विभाग, महिला व बालविकास, शिक्षण, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व समिती सदस्यांची उपस्थिती.


Article image


सिंधुदुर्गनगरी : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सभागृहात संपन्न झाली. बैठकीस आरोग्य विभाग, महिला व बालविकास, शिक्षण, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते.

Article image


एचआयव्ही / एड्स प्रतिबंध, जनजागृती, तपासणी व उपचार सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करून समाजामध्ये जागरूकता निर्माण करावी, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सांगितले.

बैठकीत राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. एचआयव्ही तपासणी केंद्रांचे कार्य, एचआयव्ही बाधित व्यक्तींना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या उपचार सेवा, समुपदेशन, जनजागृती अभियान, उच्च जोखीम गटांसाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती सादर करण्यात आली.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खेबुडकर यांनी एचआयव्ही संसर्गाबाबत समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहिमा राबविण्याचे निर्देश दिले. शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था तसेच विविध विभागांच्या माध्यमातून लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचविण्यावर भर देण्यास त्यांनी सांगितले. तसेच एचआयव्ही बाधित व्यक्तींना कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता उपचार, समुपदेशन आणि शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळेल, यासाठी संबंधित विभागांनी संवेदनशीलतेने कार्य करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी गर्भवती महिलांची वेळेत एचआयव्ही तपासणी, सुरक्षित रक्तपुरवठा, युवकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती, क्षयरोग व एचआयव्ही संयुक्त तपासणी, तसेच विविध विभागांच्या समन्वयातून प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स