आमदार निलेश राणे यांची मागणी आणि जिल्ह्यात दशावतार कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातले अधिकारी दाखल
आमदार निलेश राणे यांची मागणी आणि जिल्ह्यात दशावतार कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातले अधिकारी दाखल.
आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल व पदाधिकारी उपस्थित.
प्रत्येक तालुक्यात जाऊन दशावतार कलाकारांच्या भेटीगाठी घेऊन नोंद गोळा करण्यात येणार.
मालवण | ब्यूरो न्यूज : आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात केलेल्या मागणीनंतर सांस्कृतिक मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असून त्यांनी गुरुवार, १६ जुलै २०२६ पासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे. दशावतारी कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातील हे अधिकारी सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांची अधिकृत नोंद करून त्यांना पुढील लाभ मिळावेत आणि एकही कलाकार या लाभापासून वंचित राहू नये यासाठी ऑनलाइन नोंदणी न करता मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात जिल्ह्यात येऊन काम करण्याची मागणी आमदार निलेश राणे यांनी सभागृहात केली होती, त्यानुसार संबंधित खात्याचे अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. पुढील काही दिवस प्रत्येक तालुक्यात जाऊन हे अधिकारी दशावतार कलाकारांच्या भेटीगाठी घेऊन नोंद गोळा करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेल्या अधिकाऱ्यांचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे स्वागत केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हापरिषद उपाध्यक्ष दादा साईल, देवेंद्र नाईक, अरविंद करलकर आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)