ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 'एक पेड माँ के नाम' उपक्रमांतर्गत वायरी बांध येथे वृक्षारोपण.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 'एक पेड माँ के नाम' उपक्रमांतर्गत वायरी बांध येथे वृक्षारोपण.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 'एक पेड माँ के नाम' उपक्रमांतर्गत वायरी बांध येथे वृक्षारोपण.

Article image


श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज संप्रदाय, मालवण आणि अनुलोम यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम. 


भाजप एनजीओ आघाडी जिल्हा संयोजक भालचंद्र उर्फ बबलू राऊत आणि मान्यवरांची उपस्थिती.


मालवण : भारत सरकारच्या 'एक पेड माँ के नाम' या पर्यावरण संवर्धन उपक्रमांतर्गत तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अनुलोम संस्थेन्या संपूर्ण महाराष्ट्रात ५७ हजार वृक्ष लागवडीच्या राज्यव्यापी अभियानाचा एक भाग म्हणून श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज संप्रदाय, मालवण आणि अनुलोम यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र दत्त मंदिर, वायरी बांध, मालवण येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीक्षेत्र दत्त मंदिरात सद्गुरूंच्या प्रतिमेचे पूजन करून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्यात आला.  यावेळी कु. ज्ञानेश्वरी झाड आणि श्री. चैतन्य झाड यांच्याही वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांच्या शुभहस्ते विविध देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. 


कार्यक्रमाला संस्थेचे सचिव तथा भाजप एनजीओ आघाडी जिल्हा संयोजक भालचंद्र उर्फ बबलू राऊत यांच्यासह संस्था पदाधिकारी विनायक निवेकर, अनुलोमच्या सौ. मानसी केळुसकर, पांडुरंग घाडीगावकर, सौ. अमिता निवेकर, महेश हुले, बंड्या तळाशीलकर, मिलिंद झाड, गोपाळ कवटकर, शेखर झाड, सौ. तृप्ती झाड, सौ. बांदेकर, सौ. प्राची परब, सौ. कांदळगावकर, प्रशांत परब, भूषण हुले, अमित आचरेकर, सौ. सुरेखा सातार्डेकर यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



श्री. भालचंद्र उर्फ बबलू राऊत यांनी त्यांच्या मनोगतात पर्यावरणाचे रक्षण ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे असे स्पष्ट केले. वृक्षारोपण ही केवळ एकदिवसीय मोहीम नसून वृक्षांचे संगोपन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे असे आग्रहाचे आवाहन करताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण उपयोगी उपक्रम राबवून त्यांना शुभेच्छा देण्याच्या अनुलोमच्या संकल्पनेची श्री. राऊत यांनी प्रोत्साहनपर प्रशंसा केली.

Article image


विनायक निवेकर, अमित आचरेकर आणि सौ. अमिता निवेकर यांनीही पर्यावरण संवर्धनासाठी त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सौ. मानसी केळुसकर यांनी संस्थेचे पर्यावरण व वृक्ष संवर्धनाबाबत उद्देश समजावून सांगितले. 


कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थितांनी वृक्षारोपणानंतर लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करण्याची सामूहिक शपथ घेतली. 


श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज संप्रदाय आणि अनुलोम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ह्या उपक्रमाच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल संस्थेचे सचिव तथा भाजप एनजीओ आघाडी जिल्हा संयोजक भालचंद्र उर्फ बबलू राऊत यांनी माहिती दिली असून सहभागींच्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन.

लोकप्रिय टॅग्स