ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
सिंधुदुर्ग महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जागृतीपर उपक्रम संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सिंधुदुर्ग महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जागृतीपर उपक्रम संपन्न.

सिंधुदुर्ग महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जागृतीपर उपक्रम संपन्न.

Article image

मालवण : मालवण शहरातील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे अर्थशास्त्र विभाग व व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिन विविध जनजागृतीपर उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढती लोकसंख्या, तिचे सामाजिक - आर्थिक परिणाम, कुटुंब नियोजन, आरोग्य जागरूकता आणि शाश्वत विकास या विषयांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. व्ही. हरगिले होते. 


व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग प्रमुख लेफ्ट. प्रा. डॉ. एम. आर. खोत यांनी प्रास्ताविक करताना जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. लोकसंख्या वाढीमुळे देशाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणीय क्षेत्रांवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेत त्यांनी विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक म्हणून लोकसंख्या नियंत्रण व जनजागृतीमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.


यावेळी प्रमुख वक्त्या डॉ. उज्वला सामंत यांनी 'लोकसंख्या वाढ आणि परिणाम तसेच लोकसंख्या नियंत्रणाची आवश्यकता' या विषयावर मार्गदर्शन केले. भारतातील लोकसंख्येची सद्यस्थिती, लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगारी, दारिद्रय, शिक्षण, आरोग्य, निवास, अन्नसुरक्षा आणि पर्यावरणीय समस्यांवर त्यांनी विवेचन केले. तसेच कुटुंब नियोजन, महिलांचे शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, आरोग्य सेवा, जनजागृती आणि सुशिक्षित समाजाची निर्मिती या माध्यमातून लोकसंख्या स्थिरतेचे उद्दिष्ट साध्य करता येईल, असे त्यांनी प्रतिपादन केले. 


यावेळी संग्राम पवार, संकेत बेळेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिसबा काझी हिने केले तर गौतम मानवर याने आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरती सामंत, तन्वी साळकर, कु. मयुरेश, कु. मितेश आणि कु. विनीत यांनी परिश्रम घेतले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे या...

06 Sep 2026 517

लोकप्रिय टॅग्स