ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
श्री. शिवाजी वाचन मंदिरात कागदी पिशव्या व लखोटे तयार करण्याचे प्रशिक्षण.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

श्री. शिवाजी वाचन मंदिरात कागदी पिशव्या व लखोटे तयार करण्याचे प्रशिक्षण.

श्री. शिवाजी वाचन मंदिरात कागदी पिशव्या व लखोटे तयार करण्याचे प्रशिक्षण. 

Article image


प्रशिक्षक चंद्रशेखर कोचरेकर यांचे मुलांना प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन. 


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातल्या भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिरात जागतिक कागदी पिशव्या दिनाचे औचित्य साधत मुलांसाठी कागदी पिशव्या व लखोटे तयार करण्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात प्रशिक्षक चंद्रशेखर कोचरेकर यांनी मुलांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण दिले तसेच त्यांच्या पर्यावरणीय महत्त्वाविषयी मार्गदर्शन केले.


प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणास निर्माण होणारे धोके लक्षात घेऊन पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करण्याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. प्लास्टिकच्या पिशव्या नष्ट होण्यासाठी शेकडो वर्षांचा कालावधी लागतो, त्यामुळे जमीन, जलस्रोत आणि सागरी पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो. त्याउलट कागदी पिशव्या पुनर्वापरयोग्य, सहज विघटनशील आणि पर्यावरणपूरक असल्याने त्यांचा वापर वाढविण्याची गरज असल्याचे कोचरेकर यांनी सांगितले. दैनंदिन खरेदी करताना प्रत्येकाने प्लास्टिकऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करण्याची सवय लावली तर पर्यावरण संरक्षणाला मोठी मदत होईल, असे आवाहनही त्यांनी केले. 


या प्रशिक्षण उपक्रमास मानसी दुधवडकर, साक्षी सावंत यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, कीर्तन आणि धार्मिक - सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात : उद्योजक दत्ता सामंत

लोकप्रिय टॅग्स