श्री. व सौ. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांची निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांच्याशी भेट.
श्री. व सौ. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांची निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांच्याशी भेट.
ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकातल्या नगरपंचायतच्या मालकीच्या जागेतील जेष्ठ व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी त्यांची पत्नी व इमारती मधील व्यावसायिक सौ. ऋणाली राजेंद्र पेडणेकर यांच्या समवेत निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी आरती देसाई यांची भेट घेतली.
यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी इमारती संदर्भात सविस्तर चर्चा केली आणि जिल्हाधिकारी यांनी इमारती व जागे संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतली.
यावेळी नगरपंचायतच्या मालकीच्या जागेबाबत निवेदन देण्यत आले. पेडणेकर दांपत्यने निवासी जिल्हाधिकारी आरती देसाई यांचा पुष्पगुच्छ देत सदिच्छा सन्मान केला.
सादर केलेल्या निवेदनात म्हणले आहे की, कणकवली अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे असलेले नगरपंचायत मालकीचे व्यापारी मार्केट ( पूर्वीचे भाजी मार्केट) मधील स्लॅब ची इमारत पूर्णतः कोसळण्याच्या मार्गावर असून, पहिल्या मजल्यावरील भिंती, छप्पर सुध्दा कोसळून पडले आहे. एका बाजूने स्लॅब सुध्दा कोसळला असून, इमारत धोकादायक बनली आहे, या मध्ये एकुण १३ + पहिल्या मजल्यावर ३ + १ पत्रा शेड असे एकूण १७ गाळे धारक आहेत. त्याचप्रमाणे ३६ खोके धारक असून या सर्वांची नगरपंचायत मध्ये नोंद असून सर्व वेळोवेळी भाडे भरणा करत आहेत. महसूलच्या जागेत ११ खोके धारक आहेत. त्याचप्रमाणे काही वर्षे येथील गाळे भाड्याने घेऊन, जे व्यवसाय करत आहेत त्यांचा ही विचार केला जावा असे निवेदनाद्वारे नमूद करण्यात आले आहे
या १२ जुलै २०२६ च्या निवेदनाद्वारे, नव्याने होणाऱ्या संकुलात, नवीन नियमानुसार आवश्यक अनामत रक्कम, नव्याने लागू होणारे भाडे भरण्यास तयार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी
सविस्तर माहिती जाणून घेतल्याबद्दल श्री व सौ राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आभार व्यक्त केले आहेत आणि यासंदर्भात प्रत्यक्ष पहाणी करून हा मुद्दा शासन दरबारी पोहोचवत लवकरात लवकर संबंधीत सर्वांना दिलासा द्यावा अशी विनंती केली आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)