ताज्या बातम्या
कथाकार शांताराम पुरस्कारासाठी सचिन मणेरीकर यांच्या ‘फणस - कोकणातल्या माणसांच्या गोष्टी’ पुस्तकाची निवड. दिवंगत नाना पाटेकर यांच्या कुटुंबियांचे आमदार निलेश राणे यांच्याकडून पुणे येथे निवासस्थानी भेट घेत सांत्वन. मालवणात मोकाट श्वान निर्बिजीकरण मोहीम सुरू. हा खरा राष्ट्रभक्त कलाकार आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही : पालकमंत्री नितेश राणे आनंदव्हाळ - कर्लाचाव्हाळ येथे वनराई बंधारा. मुणगे गावचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ भजनीबुवा सुरेश बोरकर यांचा सत्कार. श्री घुमडाई देवी मंदिरात १२ व १३ ऑक्टोबर रोजी सर्वांच्या कल्याणासाठी नवचंडी याग. मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत. ॲड. देवदत्त परुळेकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा अध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार जाहीर. सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन.
श्री देव पाटेश्वर यांचे दर्शन घेत आमदार प्रमोद जठार यांची सर्वांच्या सुख, समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्री देव पाटेश्वर यांचे दर्शन घेत आमदार प्रमोद जठार यांची सर्वांच्या सुख, समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना.

श्री देव पाटेश्वर यांचे दर्शन घेत आमदार प्रमोद जठार यांची सर्वांच्या सुख, समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना.


भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित

Article image


सावंतवाडी : श्रावण सोमवार निमित्त आमदार प्रमोद जठार यांनी सावंतवाडी येथील प्रसिद्ध श्री देव पाटेश्वर देवस्थानाला भेट देत श्री देव पाटेश्वर यांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विधिवत पूजा - अर्चा करून सर्वांच्या सुख, समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना केली. आमदार प्रमोद जठार यांनी मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले आणि पूजा केली. 


यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संतोष साखरे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, मंडळ अध्यक्ष सुधीर आदिवरेकर, मनोज नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, इपाली भालेकर, मधुसूदन देसाई, संतोष राऊळ आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


आमदार प्रमोद जठार यांनी श्रावण सोमवारच्या पवित्र पर्वावर श्री देव पाटेश्वराचे दर्शन घेतल्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही भक्ती चैतन्यासह उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले अशी माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

युवा नेते विशाल परब यांच्या वतीने धाकोरे क्र. १ शाळेत शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

युवा नेते विशाल परब यांच्या वतीने धाकोरे क्र. १ शाळेत शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.

युवा नेते विशाल परब यांच्या वतीने धाकोरे क्र. ...

14 Jul 2026 284

लोकप्रिय टॅग्स