मालवण ग्रामीण रुग्णालय येथे स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ असे दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त.
मालवण ग्रामीण रुग्णालय येथे स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ असे दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची आमदार निलेश राणे यांनी नुकतीच घेतली होती भेट.
मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या यशस्वी पाठवुराव्यातून मालवण ग्रामीण रुग्णालय येथे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या आदेशाने दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत बागडे, बालरोग तज्ञ डॉ. वैशाली चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबत महायुती सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, खासदार नारायण राणे, आरोग्य मंत्री प्रकाश अबीटकर, पालकमंत्री नितेश राणे तसेच आमचे आमचे आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत या सर्वांचे शिवसेना मालवण तालुका प्रमुख मंदार लुडबे यांनी जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी नुकतीच भेट घेतली होती.
आमदार निलेश राणे यांनी नुकतीच सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेवून मतदारसंघातील आरोग्यस्थितीचा अहवाल सादर केला होता. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. याबाबत मालवणसह जिल्ह्यातील नागरिकांना अधिक दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न, उपायोजना याबाबत सकारात्मक तोडगा व निर्णायक चर्चा घडल्या अशी प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)