ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना शाखा – सिंधुदुर्गची स्थापना.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना शाखा – सिंधुदुर्गची स्थापना.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना शाखा – सिंधुदुर्गची स्थापना.

Article image

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षक एकजुटीचा ऐतिहासिक अध्याय सुरू झाल्याची विविध स्तरांतून प्रतिक्रिया. 


मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपर्यंत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेची 'अधिकृत शाखा अस्तित्वात नसल्यामुळे' शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर एकसंघपणे भूमिका मांडताना अनेक अडचणी येत होत्या. विविध संघटना स्वतंत्रपणे कार्यरत असल्या तरी शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी एक सक्षम आणि प्रभावी व्यासपीठाची गरज सातत्याने जाणवत होती.याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्रमुख शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी एकत्र आले आणि शिक्षकांच्या हितासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेत 'महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, शाखा सिंधुदुर्ग' ची स्थापना केली. विशेष म्हणजे या नव्या शाखेला महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती संघटनेची अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे.

या स्थापनेमुळे जिल्ह्यातील हजारो शिक्षकांना एक सक्षम, प्रभावी आणि संघर्षशील व्यासपीठ उपलब्ध झाले असून शिक्षकांच्या समस्या, शैक्षणिक प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या मुद्द्यांसाठी आता एकत्रित ताकद उभी राहणार आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.


बदलत्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि सामाजिक परिस्थितीत शिक्षकांसमोरील आव्हाने दिवसेंदिवस वाढत असतात. जनगणना, निवडणुका, विविध शासकीय सर्वेक्षणे, ऑनलाइन कामांचा वाढता बोजा आणि सोबतच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आव्हान अशा दुहेरी जबाबदाऱ्या शिक्षकांवर पडतात. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी मतभेद बाजूला ठेवले आहेत.



नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्व संघटनांच्या सर्वानुमते नेतृत्व संतोष पाताडे यांची जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.  लक्ष्मण वळवी यांची जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली. 


यावेळी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले. विविध विचारप्रवाह, विविध संघटना आणि विविध नेतृत्व एकाच ध्येयाने – 'शिक्षक, शिक्षण आणि विद्यार्थी हित'– या उद्दिष्टासाठी एकत्र आल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


या संघटनेची कार्यकारिणी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे. 

जिल्हाध्यक्ष : संतोष पाताडे, जिल्हा सचिव : लक्ष्मण वळवी, कार्याध्यक्ष : सुहास सावंत, सहसचिव : गणेश नाईक, कोषाध्यक्ष : सचिन जाधव, सल्लागार : म. ल . देसाई, उपाध्यक्ष : शिवाजी पवार, प्रसिद्धीप्रमुख : अमित ठाकूर, उपाध्यक्ष : दिलीप मस्के, उपाध्यक्ष : विकास वाडीकर, उपाध्यक्ष : अमोल कांबळे, कार्याध्यक्ष : विनायक हरकुळकर, उपाध्यक्ष : सोमनाथ शेंगाळ, सदस्य : संतोष पेंडणकर, सल्लागार : ए. डी. राणे.


शिक्षकांना शैक्षणिक कामांव्यतिरिक्त दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा, जनगणना व इतर प्रशासकीय कामांमुळे होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, रिक्त पदे, सेवा विषयक प्रश्न, पदोन्नती, वेतन, निवृत्तीवेतन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांसारख्या विषयांवर ही संघटना आता प्रभावीपणे आवाज उठवणार आहे.

या बैठकीला महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, महाराष्ट्र राज्य पदवीधर, केंद्र प्रमुख प्राथमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती, महाराष्ट्र प्राथमिक उर्दू शिक्षक संघटना, प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक महासंघ, कस्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य केंद्र प्रमुख संघटना महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक संघटना,महाराष्ट्र राज्य सत्यशोधक शिक्षक संघटना तसेच जिल्ह्यातील इतर विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व संघटनांनी शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी आणि शिक्षण व्यवस्थेच्या बळकटीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना (महाराष्ट्र राज्य संलग्न) शाखा सिंधुदुर्गच्या स्थापनेला एकमुखी पाठिंबा दिला.


'संघर्षासाठी एकजूट, शिक्षणासाठी बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कटिबद्धता' हे ब्रीद घेऊन स्थापन झालेली ही शाखा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक चळवळीला नवी दिशा देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


शिक्षकांच्या एकजुटीचा हा ऐतिहासिक क्षण केवळ संघटना स्थापनेपुरता मर्यादित नसून, तो सिंधुदुर्गच्या शैक्षणिक भविष्यासाठी उभा राहिलेला आशेचा नवा दीपस्तंभ असल्याची भावना उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली.


'एक शिक्षक – एक आवाज – एक संघटना' या भावनेतून उभी राहिलेली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, शाखा सिंधुदुर्ग, आगामी काळात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रभावीपणे कार्य करेल, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब

लोकप्रिय टॅग्स