ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
'एमआयडिसी' मधील सर्व उद्योजकांना पोलिस प्रशासनाचे कामगारांची अद्यावय माहिती पोलिस ठाण्यात पुरविण्याचे आवाहन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'एमआयडिसी' मधील सर्व उद्योजकांना पोलिस प्रशासनाचे कामगारांची अद्यावय माहिती पोलिस ठाण्यात पुरविण्याचे आवाहन.

'एमआयडिसी' मधील सर्व उद्योजकांना पोलिस प्रशासनाचे कामगारांची अद्यावय माहिती पोलिस ठाण्यात पुरविण्याचे आवाहन.


कुडाळ । प्रतिनिधी : कुडाळ औद्योगिक 'एमआयडिसी' क्षेत्रातील सर्व उद्योजक, कारखानदार व आस्थापनांनी त्यांच्या कंपनीत कार्यरत असलेल्या सर्व कामगार व नोकरांची अद्ययावत माहिती स्थानिक कुडाळ पोलिस ठाण्यात सादर करावी, असे आवाहन कुडाळ पोलिस प्रशासनाने केले आहे. 


पोलिसांनी दिलेल्या पत्रानुसार, अलीकडे घडलेल्या आक्षेपार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच औद्योगिक परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हा प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहे अशी माहिती मिळत आहे. याअंतर्गत उद्योग मालकांनी आपल्या कंपनीतील सर्व कामगारांची वैयक्तिक माहिती संकलित करून त्याची प्रत संबंधित पोलिस ठाण्यात जमा करावी. तसेच कामगारांची आवश्यक ती पडताळणी करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.


यासोबतच, परिसरातील नागरिकांनाही आवाहन करण्यात आले आहे की, जर कोणत्याही उद्योग, कंपनी किंवा व्यक्तीकडे परप्रांतीय कामगार वास्तव्यास अथवा कामावर असतील आणि त्यांची अधिकृत नोंद करण्यात आलेली नसल्याची माहिती असल्यास, ती तत्काळ कुडाळ पोलिस ठाण्याला कळवावी. नागरिकांच्या सहकार्यामुळे औद्योगिक परिसरातील गैरव्यवहारांना आळा घालण्यास मदत होईल, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. २९ जून २०२६ रोजीच्या एका पत्राद्वारे तसे सूचित करण्यात आले आहे.


कुडाळ MIDC परिसरातील सर्व उद्योजकांनी या सूचनांची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स