ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
कुडाळात १० मे रोजी  पाचवे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कुडाळात १० मे रोजी पाचवे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन.

कुडाळात १० मे रोजी पाचवे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन. 

Article image


कुडाळ: नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने 'पाचवे राष्ट्रीय पर्यावरण संमेलन' रविवार दिनांक १० मे २०२६ रोजी कुडाळ येथे संपन्न होणार आहे. यावेळी सकाळी ७.३० वाजल्यापासून विवध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. हा कार्यक्रम जय वासुदेवानंद हाॅल, आर. एस. एम. हाॅटेलजवळ, उद्यमनगर, कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.

Article image


संमेलनाचे‌ उद्घाटन मा. सौ. नीलम नारायण राणे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी मा. सुयोग धस (संस्थापक अध्यक्ष मानवता विकास संस्था राष्ट्रीय अध्यक्ष) हे राहाणार आहेत. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पर्यावरण प्रेमी उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ सिनेअभिनेते तथा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर (NEFDO) जयरामजी नायर व‌ विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असणार आहेत. 


या संमेलनात पर्यावरण संवर्धन, पर्यटन, हवामान बदल यासारख्या विषयांवर चर्चा होईल. वृक्षदिंडी मिरवणूक, शैक्षणिक साहित्य प्रदर्शन, पर्यावरण जागृती कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम होतील.

पर्यावरण क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या पदाधिकारी मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दुसऱ्या सत्रात पर्यावरणावर मार्गदर्शन आणि पाहुण्यांची भाषणे होतील. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत पर्यावरण अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मालाड पर्यावरण व मानवता विकास संस्था अध्यक्षा पल्लवी उमरे आणि मानवता विकास संस्थेचे वतीने देण्यात आली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स