गटविकास अधिकारी परागिणी पाटील यांचे सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्गकडून स्वागत.
गटविकास अधिकारी परागिणी पाटील यांचे सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्गकडून स्वागत.
सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गांच्या विविध समस्यांविषयी चर्चा करुन सहकार्याची विनंती.
मसुरे | प्रतिनिधी : मालवण पंचायत समितीच्या नूतन गटविकास अधिकारी 'वर्ग १' सौ. परागिणी पाटील यांचे सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुका कार्यकारिणीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष श्री. हनुमंत गणेश प्रभू यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गांच्या विविध समस्यांविषयी चर्चा करुन सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. सिंधुदुर्ग यांच्याकडील जावक क्रमांक ४५४ तारीख २७ - ०५ - २०२६ च्या पत्राकडे लक्ष वेधून त्याची अंमलबजावणी तालुका पातळीवरुन त्वरीत करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली.
यावेळी सदस्य ए. एन. ओटवणेकर, एस. टी. गावडे, पी. टी. पेडणेकर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)