जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा नेरूर शिरसोसचे शिष्यवृत्ती व जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश.
जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा नेरूर शिरसोसचे शिष्यवृत्ती व जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश.
कु. पियुष विजय लाड याची इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत ९४% गुणांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्ती व महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीत ६ व्या क्रमांकावर झेप आणि जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत ९७% गुणांसह नवोदय विद्यालयातील निवडिची निश्चिती.
कुडाळ | प्रतिनिधी : कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नेरूर शिरसोस प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी २०२५ - २६ वर्षात घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती व जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश संपादन केले आहे. यामध्ये प्रशालेचा विद्यार्थी कु. पियुष विजय लाड याने पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत ९४% गुण प्राप्त करत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम व महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीत ६ वा क्रमांक प्राप्त केला. तसेच जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत ९७% गुण प्राप्त करत नवोदय विद्यालयात निवड निश्चित केली आहे. महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ आयोजित गणित प्रज्ञाशोध परीक्षेत सुवर्ण श्रेणीत स्थान मिळवत शिष्यवृत्ती व पदक पटकावले.
तसेच प्रशालेतील विद्यार्थिनी कु. प्राजक्ता रामचंद्र शृंगारे हिने पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत ७८% गुणांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११वा क्रमांक प्राप्त केला. जवाहर नवोदय विद्यालयासाठी देखील तिची निवड झाली असून गणित प्रज्ञाशोध परीक्षेत रौप्य पदक पटकावले. तसेच कु. अथर्व यशवंत गावडे याने ७०% गुणांसह जिल्ह्यात ६९ व्या क्रमांकाचा मान मिळविला असून नवोदय प्रवेश परीक्षा व गणित प्राविण्य परीक्षेतही यश प्राप्त केले आहे. कु. सान्वी प्रकाश केरकर या विद्यार्थिनीची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून गणित प्राविण्य परीक्षेत यश मिळविले आहे.
या प्रशालेचे कु. जयेश महेश नेवगी, कु. पार्थ अनिल नेवगी व कु. रुद्र मिलिंद केरकर हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत.
या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गशिक्षिका श्रीमती अरुणा अनंत घाटकर, श्रीमती पूजा कोठावळे, श्रीमती प्रीती कुबल या शिक्षकांचे व पालकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मुख्याध्यापक श्री. श्रीकृष्ण ठाकूर, नेरूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. गोविंद चव्हाण, नेरूर सरपंच श्रीमती भक्ती घाडीगांवकर, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती नेरूर शिरसोस, शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)