ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ लिपिक जयवंत पेडणेकर यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ लिपिक जयवंत पेडणेकर यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा.

वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ लिपिक जयवंत पेडणेकर यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा. 



कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर व मान्यवरांची उपस्थिती.

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ लिपिक जयवंत भाऊ पेडणेकर यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे शाळा समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, खजिनदार रविंद्र पावसकर, संचालक महेश वाईरकर, स्वाती वराडकर, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक ऋषी नाईक, साळगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेचे सहायक शिक्षक श्री. नार्वेकर, श्री. बागेवाडी, माजी मुख्याध्यापक चंद्रकांत पंडित, लिपिक श्री. सावंत आदी उपस्थित होते.  यावेळी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व प्रशालेच्या वतीने श्री. जयवंत पेडणेकर यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.


यावेळी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी सांगितले, आज जगामध्ये सेवाभाव महत्त्वाचा ठरतो आहे. पण अशा सेवाभावी मूल्यांची प्रशासनातील भूमिका महत्वाची असून अशी सेवाभावी व्यक्तिमत्वे प्रशासनातील खरे आधारस्तंभ असतात व ते मार्गदर्शक असतात. त्यांच्या बहुमोल सल्ल्यामुळे प्रशासन गतिमान होत असते. आजच्या युगात अशी सेवाभावी व्यक्तिमत्वे निर्माण होणे काळाची गरज आहे, असे प्रशंसोद्गार श्री. वराडकर यांनी काढले. 


यावेळी संस्थेचे सचिव सुनील नाईक, सहसचिव एस. डी. गावडे, झाराप पंचक्रोशी साळगावचे माजी अध्यक्ष प्रमोद धुरी तसेच शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावचे मुख्याध्यापक श्री. ताकीलदार, वराडकर कॉलेज कट्टा प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, पर्यवेक्षक महेश भाट, सुप्रिया नाईक, एकनाथ राऊळ, विद्यानंद पिळणकर, सुनील पाटकर यांनी मनोगत व्यक्त केले. 


या कार्यक्रमावेळी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. प् प्रशालेच्या मुख्याध्यापिका देवयानी गावडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे या...

06 Sep 2026 517

लोकप्रिय टॅग्स