नगरसेवक मंदार ओरसकर यांच्या पुढाकारातून दांडी स्मशानभूमी परिसराची स्वच्छता.
नगरसेवक मंदार ओरसकर यांच्या पुढाकारातून दांडी स्मशानभूमी परिसराची स्वच्छता.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील दांडी स्मशानभूमी परिसरात वाढलेल्या रानगवतामुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच परिसरातील वीज वितरणाच्या डीपीभोवती दाट झाडी वाढल्याने वीज दुरुस्तीच्या कामातही अडथळे येत होते. याची दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गटाचे नगरसेवक मंदार ओरसकर यांच्या पुढाकारातून परिसराची साफसफाई करण्यात आली.
दांडी स्मशानभूमी तसेच डीपी परिसरातील वाढलेले रानगवत आणि झुडपे हटविण्यात आली. त्यामुळे स्मशानभूमी परिसर स्वच्छ आणि मोकळा झाला असून, स्थानिकांच्या मागणीनुसार ही साफसफाई तातडीने करण्यात आली. यामुळे वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना काम करणे अधिक सोयीचे झाले असून, आपत्कालीन परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी लागणारा वेळही कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती मिळत आहे.
या स्वच्छता मोहिमेत रोशन कांबळी, बबन वाघ यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत नियमित स्वच्छता राखण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)