ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मालवण नगरपरिषदेच्या वतीने मच्छर प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष औषध फवारणी मोहीम.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण नगरपरिषदेच्या वतीने मच्छर प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष औषध फवारणी मोहीम.

मालवण नगरपरिषदेच्या वतीने मच्छर प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष औषध फवारणी मोहीम.

Article image


आरोग्य सभापती व नगरसेविका सौ. पूनम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेविका सौ. नीना मुंबरकर यांच्या उपस्थितीत स्वच्छता निरीक्षक संजय पवार, मुकादम आनंद वळंजू, सहायक मुकादम बाळकृष्ण जाधव व अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग.


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या मच्छरजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील विविध भागांमध्ये विशेष औषध फवारणी मोहीम राबविण्यात आली. शुक्रवार, ३ जुलै रोजी ही मोहीम मालवण नगरपरिषद आरोग्य सभापती तथा नगरसेविका सौ. पूनम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.


या मोहिमेअंतर्गत देऊळवाडा परिसरासह शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा मच्छरांची उत्पत्ती होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी उच्च दाबाच्या यंत्राद्वारे कीटकनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. नाले, झाडीझुडपे, रस्त्यालगतची जागा तसेच मच्छरांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.


यावेळी आरोग्य सभापती तथा नगरसेविका सौ. पूनम चव्हाण, नगरसेविका सौ. नीना मुंबरकर, स्वच्छता निरीक्षक श्री. संजय पवार, मुकादम श्री. आनंद वळंजू, सहायक मुकादम श्री. बाळकृष्ण जाधव तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


नागरिकांनी त्यांच्या परिसरात पाणी साचू न देणे, स्वच्छता राखणे आणि मच्छरांच्या उत्पत्तीला आळा घालण्यासाठी नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन मालवण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स