प्रिया मयेकर यांना राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान.
प्रिया मयेकर यांना राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मूळ वेंगुर्ले येथील सौ. प्रिया प्रवीण मयेकर यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल 'राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्कार २०२६' ने गौरविण्यात आले. 'लेखन अन् मी साहित्य कला प्रतिष्ठान' व पाटील फिल्म प्रोडक्शन, कोल्हापूर' यांच्या संयुक्त विद्यमाने, डोंबिवलीतील हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वेळी या संस्थेचे संस्थापक रमेश मारुती पाटील, प्रा. डॉ. राजू श्रावस्ती तर अध्यक्षस्थानी ॲड. बाळासाहेब तोरसकर आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली फडके आणि संतोष जाधव यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मसुरे येथे जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. दीपक परब यांचे मार्गदर्शन.