शिक्षक भारती आंदोलनाने वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव अखेर मंजूर.
शिक्षक भारती आंदोलनाने वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव अखेर मंजूर.
शिक्षक भारतीच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल तसेच शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांचे अभिनंदन.
मसुरे | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि आंदोलनाला यश मिळाले आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेले शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजूर झाले असल्याची माहिती शिक्षक भारतीचे अध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली आहे.
शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षक भारतीने प्रशासनाचे लक्ष वेधले होते. निवेदने, बैठका तसेच आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सातत्याने मांडण्यात आले. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटनेने उभारलेला लढा यशस्वी ठरला. वरिष्ठ वेतन श्रेणीचे अगाऊ वेतन वाढ ६९, मुख्याध्यापक ३१, उपशिक्षक ८५ व पदवीधर ६३ असे २४८ प्रस्ताव मंजूर झाल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
या यशाबद्दल शिक्षक भारतीच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल तसेच शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांचे अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)