ॲड. सदानंद चव्हाण यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिसूचनेनुसार ठाणे जिल्हा न्यायालयात 'मिडिएटर' म्हणून नियुक्ती.
ॲड. सदानंद चव्हाण यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिसूचनेनुसार ठाणे जिल्हा न्यायालयात 'मिडिएटर' म्हणून नियुक्ती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यावासियांच्या वतीने ज्येष्ठ पुरोहित श्री. गणेश उर्फ गजू बाकरे यांच्याकडून अभिनंदनपर संदेश.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या
असगणी गावचे सुपुत्र व जेष्ठ विधिज्ञ ॲड. सदानंद चव्हाण यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिसूचनेनुसार ठाणे जिल्हा न्यायालयात 'मिडिएटर' म्हणून नियुक्ती झाली आहे. किर्लोस गांवचे ज्येष्ठ पुरोहित व सामाजिक जाणकार श्री. गणेश उर्फ गजू बाकरे यांनी एका संदेशाद्वारे, ॲड. सदानंद चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे.
गणेश उर्फ गजू बाकरे यांनी त्यांच्या अभिनंदपर संदेशात लिहिले आहे की, ॲड. सदानंद चव्हाण यांनी माजी विशेष न्याय दंडाधिकारी, दिवाणी व फौजदारी कायद्यांचे अभ्यासक, सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी सेवा संघटना अंबरनाथ या संस्थेचे अध्यक्ष, सिंधुदुर्ग नागरी सहकारी पतसंस्था अंबरनाथ या पतसंस्थेचे संचालक, अखिल भारतीय स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे मार्गदर्शक, अनेक सामाजिक संस्थांचे कायदेशीर सल्लागार, समाजसेवक आणि सदैव सक्रीय कार्यकर्ता अशा अनेक पदांना व जबाबदार भूमिकांना जबाबदारीपूर्वक कुशलतेने हाताळले आहे. 'न्याय ज्ञान आणि न्याय दान' अशा अत्यंत गंभीर घटकांच्या कार्यक्षेत्रात वावरत असताना त्यांची, ग्राम भूमीशी, तिथल्या प्रगतीशी आणि ग्राम व लगतच्या परिसरातील माणसांशी असलेले घट्ट नाते हे आदर्शवत आहे.
त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिसूचनेनुसार ठाणे जिल्हा न्यायालयात मिडिएटर म्हणून नियुक्ती झाली आहे. त्याबद्दल समस्त सिंधुदुर्ग वासियां कडून ॲड. सदानंद चव्हाण यांचे हार्दिक अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी ज्येष्ठ पुरोहित गणेश उर्फ गजू बाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)