ताज्या बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेत माजी मंत्री विजयभाई गिरकर यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाखांची मदत. मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा १९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौरा. 'वर्ल्ड फार्मासिस्ट डे सेलिब्रेशन'मध्ये विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवलचे दुहेरी यश. देवगडसमोर बेकायदा मासेमारी करणारा कर्नाटकचा हायस्पीड ट्राॅलर जप्त. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन मालवण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेत साजरा. तळकटमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. सिंधुदुर्ग ( चिपी) - नवी मुंबई दरम्यानच्या दैनंदिन विमानसेवेमुळे पर्यटन आणि रोजगाराची नवी दालने खुली : पालकमंत्री नितेश राणे समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागाची २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी जनसुनावणी. 'लास्ट उन्स डॉयच लर्नेन...!' मुणगेतील कातकरी वस्तीमध्ये देवगड मंडल भाजपाच्या वतीने 'पाडावरची दिवाळी २०२६' कार्यक्रम संपन्न.

जाहिरात

श्री भैरवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भजन महोत्सव.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)

श्री भैरवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भजन महोत्सव.

Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)

श्री भैरवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भजन महोत्सव. 

Article image


श्री देवी भैरवी मंदिर बाळगोपाळ मित्रमंडळ, मालवण यांच्यावतीने उपस्थितीचे आवाहन.


मालवण | प्रतिनिधी : नवरात्रोत्सव २०२६ निमित्त मालवण शहरातील श्री देवी भैरवी मंदिर, संत सेना मार्ग, सोमवार पेठ येथे पारंपरिक भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री देवी भैरवी मंदिर बाळगोपाळ मित्रमंडळ, मालवण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा भजन महोत्सव यंदा १४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.


११ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दररोज रात्री ८ वाजता विविध भजन मंडळांच्या सहभागातून हा भजन महोत्सव पार पडणार आहे.  


या भजन महोत्सवात ११ ऑक्टोबर रोजी श्री अंदुर्लाई प्रासादिक भजन मंडळ, आंदुर्ले, १२ रोजी श्री ब्राह्मणदेव प्रसन्न भजन मंडळ, कांदळगाव - कातवड, १३ रोजी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ, कातवड, १४ रोजी देवकी माता प्रासादिक भजन मंडळ, न्हिवे, तर १५ रोजी आकारी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ, कांदळगाव-कातवड यांची भजने होणार आहेत. १६ ऑक्टोबर रोजी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ, आनंदव्हाळ, १७ रोजी आई तुळजाभवानी ढोलकी भजन मंडळ, वायरी मालवण, १८ रोजी बाल दांडेश्वर भजन मंडळ, दांडी मालवण, १९ रोजी श्री देवी घुमडाई सातेरी प्रासादिक भजन मंडळ, घुमडे आणि २० ऑक्टोबर रोजी अष्टपैलू कलानिकेतन भजन मंडळ, मालवण यांचा सहभाग राहणार आहे.


या भजन महोत्सवाच्या माध्यमातून नवरात्रोत्सवात भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचा संगम अनुभवता येणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भजनांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक श्री देवी भैरवी मंदिर बाळगोपाळ मित्रमंडळ, मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स