ताज्या बातम्या
लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...! मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीतील पत्रकार परिषदेत विशेष सखोल पुनरिक्षण मोहिम २०२६ साठी प्रशासनाच्या सज्जतेची माहिती.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीतील पत्रकार परिषदेत विशेष सखोल पुनरिक्षण मोहिम २०२६ साठी प्रशासनाच्या सज्जतेची माहिती.


जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीतील पत्रकार परिषदेत विशेष सखोल पुनरिक्षण मोहिम २०२६ साठी प्रशासनाच्या सज्जतेची माहिती. 

Article image


उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची उपस्थिती.


सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेची (SIR-2026) पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची उपस्थिती होती. 


यावेळी माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाल्या की, मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम - २०२६ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता दिनांक निश्चित करण्यात आली आहे. ३० जून ते २९ जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत ( BLO) घरोघरी भेटी घेतल्या जाणार आहेत. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर नियुक्त असलेले केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी व मतदार यादी सर्वेक्षण करणार आहेत. मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेचा मूलभूत आधार असल्याने प्रत्येक नागरिकाने आपल्या नावाची नोंद, पत्ता व इतर तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. लोकशाही अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देऊन आपल्या भागातील केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन देखिल जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.


जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, प्रारूप मतदार यादी ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणार असून, अंतिम मतदार यादी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर केली जाणार आहे. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून नवमतदारांची नोंदणी, मृत अथवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, तसेच मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ६ लाख ८८ हजार १४ मतदार आहेत. यामध्ये ३ लाख ४० हजार ४५० पुरुष आणि ३ लाख ४७ हजार ५६४ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदार यादीतील नोंदींचे अचूक मॅपिंग आणि विसंगती दूर करण्यासाठी व्यापक मोहीम सुरू असून, जिल्ह्यात ९२.४२ टक्के मॅपिंग पूर्ण झाले आहे. मतदार यादी पुनरीक्षणासाठी जिल्ह्यात ३ मतदार नोंदणी अधिकारी, १६ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि २१ अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच ९२१ बीएलओ, ९३ पर्यवेक्षक आणि ३ मतदार नोंदणी अधिकारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, प्रत्यक्ष ‘हँड्स - ऑन’ प्रशिक्षणही यशस्वीपणे पार पडले आहे. राजकीय पक्षांमार्फत १,२९९ बूथ लेव्हल एजंट्स नियुक्त करण्यात आले आहेत. सामान्य नागरिकांच्या तसेच बीएलओंना आवश्यक मदत मिळावी यासाठी मदत कक्ष (Help Desk) कार्यान्वित करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व विधानसभा मतदारसंघ तसेच जिल्हास्तरावर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी नियमित बैठका घेण्यात आल्या असल्याचेही जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी सांगितले. 


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स