ताज्या बातम्या
कथाकार शांताराम पुरस्कारासाठी सचिन मणेरीकर यांच्या ‘फणस - कोकणातल्या माणसांच्या गोष्टी’ पुस्तकाची निवड. दिवंगत नाना पाटेकर यांच्या कुटुंबियांचे आमदार निलेश राणे यांच्याकडून पुणे येथे निवासस्थानी भेट घेत सांत्वन. मालवणात मोकाट श्वान निर्बिजीकरण मोहीम सुरू. हा खरा राष्ट्रभक्त कलाकार आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही : पालकमंत्री नितेश राणे आनंदव्हाळ - कर्लाचाव्हाळ येथे वनराई बंधारा. मुणगे गावचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ भजनीबुवा सुरेश बोरकर यांचा सत्कार. श्री घुमडाई देवी मंदिरात १२ व १३ ऑक्टोबर रोजी सर्वांच्या कल्याणासाठी नवचंडी याग. मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत. ॲड. देवदत्त परुळेकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा अध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार जाहीर. सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन.
संरक्षण मंत्री यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रादेवी येथे २६ ऑगस्ट रोजी ८ तासांसाठी अवजड वाहनांना प्रवेशबंदी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

संरक्षण मंत्री यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रादेवी येथे २६ ऑगस्ट रोजी ८ तासांसाठी अवजड वाहनांना प्रवेशबंदी.

संरक्षण मंत्री यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रादेवी येथे २६ ऑगस्ट रोजी ८ तासांसाठी अवजड वाहनांना प्रवेशबंदी.


नागरिकांना तसेच वाहनचालकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करायचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन. 


सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : देशाचे संरक्षण मंत्री यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गोवा प्रशासनाच्या विनंतीवरून 'दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत' अशी ८ तासांसाठी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली चेक पोस्टवरून पत्रादेवी येथे गोवा राज्यात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांना तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 


दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी ही खबरदारीची उपाययोजना करण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांनी तसेच वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे. अवजड वाहन चालकांनी या कालावधीत पत्रादेवी मार्गे गोव्याच्या दिशेने प्रवास टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच पोलीस, वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि संबंधित वाहतूक यंत्रणांनी प्रवेशबंदीची प्रभावी अंमलबजावणी करून वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी आवश्यक नियोजन व समन्वय साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स