ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील सहभागासाठी आवाहन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील सहभागासाठी आवाहन.

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील सहभागासाठी आवाहन.


स्पर्धेसाठी, 'हाकला भोंदू - सुखाने नांदू', ‘नीट’ नेटकी शिक्षण पद्धती, लोकशाही आणि तरुणाई, युद्धाच्या झळांनी होरपळली भारताची अर्थव्यवस्था, सरकारी योजना - कल्याणकारी की रेवडी, चित्ती असू द्यावे समाधान' असे निबंधाचे विषय.

Article image



मसुरे | प्रतिनिधी : विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या शिक्षण विभागाच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 


'हाकला भोंदू, सुखाने नांदू, ‘नीट’ नेटकी शिक्षण पद्धती, लोकशाही आणि तरुणाई, युद्धाच्या झळांनी होरपळली भारताची अर्थव्यवस्था, सरकारी योजना: कल्याणकारी की रेवडी, चित्ती असू द्यावे समाधान' असे या निबंध स्पर्धेचे विषय आहेत. 


निबंधाची शब्द मर्यादा १,५०० असून वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर आपले विचार निबंधरूपाने लिहून त्यावर नाव, पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा अशी माहिती देण्यात आली आहे. टंकलिखित किंवा सुवाच्च अक्षरातील निबंध संस्थेच्या ११९, आनंद इस्टेट, दुसरा मजला,साने गुरुजी मार्ग, चिंचपोकळी (प) मुंबई - ४०००११ या पत्त्यावर पाठवावेत किंवा निबंधाची एक स्कॅन कॉपी पीडीएफ स्वरुपात संस्थेच्या vumm1954@gmail.com या ई-मेल आयडीवर ९ जुलै पूर्वी पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

इमेल मधील विषयात खुली राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२६ असे नमूद करावे अशी माहिती मिळत आहे.


निबंध स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु.२००१, द्वितीय पारितोषिक रु.१५०१ आणि तृतीय पारितोषिक १००१ आणि प्रमाणपत्र आहे. २७ जून रोजी काव्यवाचन स्पर्धा तसेच ११ जुलै रोजी खुली प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी २८ जून रोजी ५ वी ते १० वी साठी मराठी हस्ताक्षर स्पर्धा, १ ली ते १० साठी चित्रकला स्पर्धा, तसेच ५ जुलै रोजी १ ली ४ थी साठी पाठांतर स्पर्धा तसेच ५ वी ते १० वी व महाविद्यालयीन मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. वरील सर्व स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य असणार आहेत. अधिक माहितीसाठी संकेत शिर्के ७०३९८८८५६२, हार्दिक सकपाळ ९३७२६०८६८७ संपर्क साधावा.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स