ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
सावंतवाडीत 'बालगंधर्व ; नांदी ते भैरवी' कार्यक्रमाचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सावंतवाडीत 'बालगंधर्व ; नांदी ते भैरवी' कार्यक्रमाचे आयोजन.

सावंतवाडीत 'बालगंधर्व ; नांदी ते भैरवी' कार्यक्रमाचे आयोजन. 

Article image

क्षितिज इव्हेंट, सावंतवाडी यांच्या वतीने अध्यक्ष बाळ पुराणिक यांची माहिती व नाट्यरसिकांच्या उपस्थितीचे आवाहन. 


सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात, नटश्रेष्ठ बालगंधर्व यांच्या जीवनावर आधारित श्री परमेश्वर निर्मित, 'बालगंधर्व ; नांदी ते भैरवी' ह्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आर. पी. डी. हायस्कूलच्या सभागृहात, २६ जून २०२६ रोजी संध्याकाळी साडे पाच ( ५.३०) वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 


या कार्यक्रमात गायक स्वप्नील गोरे व गायिका राधा जोशी तसेच संगीत व ताल सहकारी अभिनव जोशी, तेजस प्रभुदेसाई, प्रसाद शेवडे यांचा सहभाग असेल. बाळ पुराणिक यांनी ह्या कार्यक्रमाचे संहिता लेखन व निवेदन केले असून उमा जडये सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.


क्षितिज इव्हेंट, सावंतवाडी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रवेश विनामूल्य आहे. नाट्यरसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे अशी माहिती क्षितिज इव्हेंट, सावंतवाडीच्या वतीने अध्यक्ष बाळ पुराणिक यांनी दिली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स