ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
श्री देवी तिळंबा मंदिर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्री देवी तिळंबा मंदिर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

श्री देवी तिळंबा मंदिर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. 

Article image

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील श्रीदेवी तिळंबा मंदिर पेंडूर येथे आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करणाऱ्या ब्युटीज ऑन व्हील्स ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ हा ग्रुप सायकलिंग, धावणे, चालणे आदी विविध व्यायाम प्रकारांद्वारे समाजात आरोग्याविषयी जनजागृती करत आहे. 


या उपक्रमाचा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात योगासने, प्राणायाम उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. सोमनाथ परब यांनी योग व प्राणायामचे मार्गदर्शन केले. योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, तणावमुक्ती आणि निरोगी जीवनशैलीसाठी योगाची आवश्यकता याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते, असा संदेश यावेळी देण्यात आला.


यावेळी डॉ. सोमनाथ परब, रुपेश भोजने, सुरेश कांबळी, निलेश हडकर, गणेश पारकर, अमित सावंत, राजेश प्रभुलकर, बंडू माडये, रविंद्र चव्हाण, उल्हास सावंत, प्रकाश सरमळकर उपस्थित होते. सायकलिंग क्षेत्रात पदार्पण केलेले सुयोग वालावलकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमा दरम्यान उपस्थित सहभागी सदस्यांनी नियमित योग, व्यायाम आणि आरोग्यदायी सवयी अंगीकारून निरोगी जीवन जगण्याचा संकल्प केला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स