ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मळगाव हायस्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मळगाव हायस्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात.

मळगाव हायस्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात.

Article image

ब्यूरो न्यूज : आंतरराष्ट्रीय (जागतिक) योग दिनानिमित्त रविवारी, २१ जून २०२६ रोजी मळगाव हायस्कूल येथे समाजसेवक नितेश तेली यांच्या संकल्पनेतून फिटनेस योग अकॅडमी, सावंतवाडी तसेच श्री दत्त पद्मनाभ पीठ, सद्गुरू योग गुरुकुल, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर योगाचे महत्त्व, निरोगी जीवनासाठी योगाची आवश्यकता तसेच नियमित योगाभ्यासामुळे होणारे शारीरिक व मानसिक लाभ याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानसाधनेची प्रात्यक्षिके सादर केली.


यावेळी मळगाव इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मारुती फाले, पर्यवेक्षक विठ्ठल सावंत, समाजसेवक नितेश तेली, फिटनेस योग अकॅडमी, सावंतवाडीचे योग शिक्षक रामनाथ सावंत, जिल्हाध्यक्षा रसिका सावंत, चेतना शिंदे, अरुण पवार, निशा गवळी, समीर हडकर, महेश परब, दर्शना पेडणेकर, प्रगती बामणे, अनिशा घाडी, रुपाली पेडणेकर, काशीनाथ पेडणेकर तसेच श्री दत्त पद्मनाभ पीठ - सद्गुरू योग गुरुकुल गोवा येथील योग शिक्षक भूतनाथ बाचोळकर, दिनानाथ काळोजी आणि कनक काळोजी यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स