ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
रोझरी इंग्लिश स्कूलच्या 'ज्युनिअर व सिनिअर केजी' विद्यार्थ्यांचा 'प्रवेशोत्सव' उत्साहात.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रोझरी इंग्लिश स्कूलच्या 'ज्युनिअर व सिनिअर केजी' विद्यार्थ्यांचा 'प्रवेशोत्सव' उत्साहात.

रोझरी इंग्लिश स्कूलच्या 'ज्युनिअर व सिनिअर केजी' विद्यार्थ्यांचा 'प्रवेशोत्सव' उत्साहात. 

Article image


मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेत, १७ जून २०२६ रोजी शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या ज्युनिअर व सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव समारंभ संपन्न झाला. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रेवरंड ॲन्थोनी डिसोज़ा यांनी शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या ज्युनिअर व सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी संबोधित करताना त्यांनी शालेय जीवन हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया असल्याचे सांगितले आणि विद्यार्थ्यांना आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शाळेचा संकल्प व्यक्त केला.

Article image


या प्रवेशोत्सव तथा स्वागत समारंभानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक व शैक्षणिक उपक्रम संपन्न झाले. ज्युनिअर व सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य, बालगीते, समूह गीते सादर केली तसेच विविध खेळ व कृती आधारित उपक्रमही संपन्न झाले.

Article image


विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी असणाऱ्या सेल्फी बोर्ड, रंगीबेरंगी फुग्यांची सजावट, विविध भित्तीपत्रके तथा पोस्टर्सनी विद्यार्थ्यांसह सर्वांचेच विशेष लक्ष वेधून घेतले.

     

प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रेवरंड ॲन्थोनी डिसोज़ा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सक्रीय सहभागाने यशस्वी झालेल्या या प्रवेशोत्सवाची प्रशंसा होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे या...

06 Sep 2026 520

लोकप्रिय टॅग्स