ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
रोझरी इंग्लिश स्कूल मध्ये दहावीतील विशेष गुणवंतांचा गौरव समारंभ उत्साहात.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रोझरी इंग्लिश स्कूल मध्ये दहावीतील विशेष गुणवंतांचा गौरव समारंभ उत्साहात.

रोझरी इंग्लिश स्कूल मध्ये दहावीतील विशेष गुणवंतांचा गौरव समारंभ उत्साहात.

Article image


मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेमधून शैक्षणिक वर्ष २०२५ - २०२६ दरम्यान इयत्ता दहावीच्या परीक्षेतील विशेष गुणवंतांचा गौरव समारंभ, १६ जून २०२६ रोजी संपन्न झाला. प्रशालेचे मुख्याध्यापक रेवरंड फादर अन्थोनी डिसोज़ा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच मानद अतिथी रेवरंड फादर ऑल्वीन गोन्साल्वीस या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे सर्व शिक्षक - शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी - विद्यार्थीनी उपस्थित होते.

Article image


रोझरी इंग्लिश स्कूलमधून साल २०२५ -२०२६ ह्या शालेय शैक्षणिक वर्षात ३९ विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन प्राप्त झाले असून ९ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी प्राप्त झाली आहे. यामध्ये कु. पार्थ उदय बागवे याने ९७. ४०% गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. कु. मधुरा विक्रम परब हिने ९६% गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तृतीय क्रमांकावर कु. समर्थ विजय यादव व कु. वंशिका मनोज रावले या दोघांनी ९५. ८०% गुण मिळवून संयुक्तपणे तृतीय क्रमांक प्राप्त केला.


मान्यवरांच्या हस्ते विशेष गुणवतांचा त्यांच्या पालकांसमवेत शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह व उपयुक्त भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींना उपयुक्त भेटवस्तू व पुष्प देत गौरविण्यात आले. या दरम्यान, विद्यार्थी विद्यार्थिनींसाठीच्या विविध शालेय शिष्यवृत्तींचे वितरण करण्यात आले.


यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रेवरंड फादर ऑल्वीन गोन्साल्वीस यांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले व पुढील सर्वांगीण वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या. 


यावेळी मुख्याध्यापक रेवरंड फादर ॲन्थोनी डिसोज़ा यांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मेहनतीची प्रशंसा केली तसेच सर्व शिक्षकांच्या समर्पण व योगदानाविषयी विशेष आनंद व्यक्त केला. 


शिक्षकांच्या वतीने, शिक्षिका ग्रॅमा आल्मेड़ा यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या वतीने, कु. पार्थ उदय बागवे, कु. वंशिका मनोज रावले व कु. मधुरा विक्रम परब यांनी मनोगत व्यक्त करत प्रशाला व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.


पालकांच्या वतीने श्री. उदय बागवे व सौ. श्वेता विजय यादव यांनी मनोगत व्यक्त करताना रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेची शिस्त, शिक्षकांचे अहोरात्र समर्पण आणि संस्थेच्या मुलांसाठीच्या सर्वांगीण विकासाप्रती असलेल्या जाणीवांना अधोरेखित करत प्रशंसा केली.


या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मारिया लुईस फर्नांडिस यांनी केले तर शिक्षिका सुजाता मुणगेकर यांनी सहसूत्रसंचालन केले शिक्षिका डायना डिसोज़ा यांनी आभार प्रदर्शन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे या...

06 Sep 2026 520

लोकप्रिय टॅग्स