ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मालवणात बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या खुल्या 'मान्सून अम्ब्रेला पेंटिंग' कार्यशाळेचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणात बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या खुल्या 'मान्सून अम्ब्रेला पेंटिंग' कार्यशाळेचे आयोजन.

मालवणात बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या खुल्या 'मान्सून अम्ब्रेला पेंटिंग' कार्यशाळेचे आयोजन.


सुप्रसिद्ध 'रंगसत्वाग्रही कलाशिक्षक' बलराम सामंत व स्नेहल सावंत यांचे मार्गदर्शन लाभणार. 


बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या वतीने कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांची माहिती.  

Article image


मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरात बॅरिस्टर नाथ पै सेवांगण यांच्या वतीने 'मान्सून अम्ब्रेला पेंटिंग कार्यशाळे'चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, २६ जून २०२६ रोजी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, धुरीवाडा, मालवण येथे दुपारी ३ ते सायंकाळी ६ वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध रंगसत्वाग्रही कलाशिक्षक बलराम सामंत व स्नेहल सावंत या मार्गदर्शन करणार आहेत. 


यावेळी सहभागींना छत्री, रंग आणि कुंचला देण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी मर्यादित प्रवेश असून ₹३००/_ ( अक्षरी : रुपये तीनशे) नोंदणी शुल्क आहे. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली असून जास्तीत - जास्त विद्यार्थी, तरुण, पालक, ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घ्यावा.


या संदर्भात अधिक माहितीसाठी वैष्णवी आचरेकर (९४०४७७६५५७) आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण व्यवस्थापक संजय आचरेकर (९४२१५६९७०४) यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या वतीने कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी दिली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स