ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
'मजला ठाव द्यावा पायी....!'
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'मजला ठाव द्यावा पायी....!'

'मजला ठाव द्यावा पायी....!'

Article image

श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान, खोटले येथील पादुका पालखीची अक्कलकोट परिक्रमा स्वामी भक्तांच्या उत्साहात.

Article image

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, मुंबई येथील सुमारे दीडशे हून अधिक स्वामी भक्तांचा सहभाग.


वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे यांच्याकडून स्वागत.


                           

मसुरे | प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान, श्री क्षेत्र खोटले येथील पादुका पालखी अक्कलकोट परिक्रमा स्वामी भक्तांच्या उत्साहात संपन्न झाली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, मुंबई येथून आलेले सुमारे दीडशे हून अधिक स्वामी भक्त या

 परिक्रमे मध्ये सहभागी झाले होते. अतिशय भक्तिमय वातावरणात ढोल, ताशा, टाळ, मृदूंग,यासह स्वामी नामाच्या गजरामध्ये पुण्यक्षेत्र अक्कलकोट निनादून गेले.

देवगड मुटाट येथील श्री रामेश्वर ढोलपथक यांचे ढोलनृत्य अक्कलकोट येथे उपस्थित असलेल्या स्वामी भक्तांना आकर्षण ठरले. तुतारी वादक भालचंद्र चव्हाण यांच्या तुतारीचा नाद अक्कलकोट मध्ये विशेष लक्षवेधी ठरला.

स्वामी आगमन स्थान श्री खंडोबा मंदिर येथे श्री गणेश पूजन खोटले येथील पालखीचे पूजन निलेश परब यांच्या हस्ते करण्यात आले. खंडोबा मंदिर चे पुजारी यांनी पालखी मधील भाविकांचे स्वागत केले आणि तिथून परिक्रमेचा शुभारंभ करण्यात आला.


वटवृक्ष देवस्थान, गुरुमंदिर, समाधी मंदिर या साडेतीन कि.मी. मार्गावर पालखी परिक्रमा संपन्न झाली.

वटवृक्ष देवस्थान येथे श्रद्धास्थान खोटले येथील स्वामी भक्तांनी भजन सेवा सादर केली. या मध्ये बुवा प्रसाद कसालकर, बुवा अशोक घाडीगावकर, बुवा सदानंद कसालकर यांनी भजने गायली. वटवृक्ष देवस्थान यांनी या पालखी परिक्रमा करिता गेलेल्या स्वामी भक्त यांना दर्शन व भजनासाठी सहकार्य केले. 


खोटले येथील पालखीचे, वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे यांनी स्वागत केले. मठाधीपती गणेश घाडीगावकर यांचा सन्मान वटवृक्ष देवस्थान समिती अध्यक्ष श्री. महेश इंगळे यांनी केला. पालखी परिक्रमेत सहभाग घेतलेल्या स्वामी भक्तांची निवास व्यवस्था गाणगापूर रोड येथील भक्त निवास मध्ये करण्यात आली होती. खोटले श्रद्धास्थान पालखी मधील स्वामी भक्तांना विशेष महाप्रसाद व्यवस्था अन्नछत्र मंडळ यांनी केली होती.

समाधी मठ येथे, खोटले येथून आलेल्या स्वामी पादुकांचे स्वागत करण्यात आले. तसेच या पादुका वर अभिषेक व महापूजा समाधी मंदिर येथे करण्यात आली. हि पूजा झाल्यावर श्रद्धास्थान खोटले यांच्या वतीने महाप्रसाद याचे आयोजन केले होते.


समाधी मंदिर येथे मुंबई निवासी श्री. निलेश परब यांनी खोटले श्रद्धास्थान भाविकांसमोर आरोग्य विषयक मदत संकल्प जाहीर केला. ज्या मध्ये स्वामी भक्तांना आरोग्य विषयक सल्ला, रुग्णांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याची मदत, शासकीय मदत मिळवून देणे, इत्यादी सेवा श्रद्धास्थान च्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्यात येईल असे निलेश परब यांनी जाहीर केले. तीन दिवसाची अक्कलकोट परिक्रमा भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. या अक्कलकोट परिक्रमचे एक वैशिट्य म्हणजे परिक्रमा मार्गांवर पिण्याचे पाणी वाटप तसेच ओआर एसचे पाणी व प्रसाद पालखी दर्शन घेणाऱ्या स्वामी भक्तांना श्रधास्थानच्या वतीने देण्यात येत होते. या अक्कलकोट परिक्रमेचे आयोजन श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान, खोटले च्या उत्सव समितीने मठाधीपती श्री गणेश घाडीगावकर यांच्या मार्गदर्शनाने केले होते. या परिक्रमा करिता महंत श्री. श्री. १०८ गावडे काका महाराज यांनी शुभेच्छा दिल्याचे घाडीगावकर यांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स