ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मसुरेत माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरेत माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात.

मसुरेत माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात.

Article image


आर. पी. बागवे हायस्कूल मधिल २००३ - २००४ च्या दहावीतल्या विद्यार्थ्यांच्या वतीने उचललेले दत्तक पालकत्वाचे पाऊल व विविध उपक्रम 'अनोखी गुरूदक्षिणा' ठरल्याची शिक्षकांची प्रतिक्रिया . 


​मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरेतील आर. पी. बागवे हायस्कूलच्या सन २००३ - २००४ मधील दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थीनींचे स्नेहसंमेलन नुकतेच विद्यालय परिसरात उत्साहात संपन्न झाले. यावेळी उपस्थित या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या वतीने, शाळेच्या विकासासाठी वीस हजार रुपयांची रोख देणगी सुपूर्द केली. 


या कार्यक्रमाला उपस्थित तत्कालीन व माजी शिक्षकांनी, सन २००३ - २००४ च्या विद्यार्थ्यांनी दोन विद्यार्थ्यांचे उचललेले 'दत्तक पालकत्वाचे' पाऊल व शाळेबद्दलची आस्था राखणारे विविध उपक्रम ही 'अनोखी गुरुदक्षिणा' असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.


​स्नेहसंमेलनाच्या सुरुवातीला अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने गुरुजनांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होताच उपस्थित सर्व शिक्षकांवर विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी केली. मुख्य कार्यक्रमात सर्व शिक्षकांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर आमंत्रित करून स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.


​या सोहळ्यात माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शिक्षकांनी त्यांच्या भाषणात जुन्या आठवणींना उजाळा देत, विद्यार्थ्यांनी राखलेली ही कृतज्ञता आणि त्यांनी सामाजिक भान ठेवून सुरू केलेले उपक्रम हीच आमच्यासाठी खरी गुरुदक्षिणा आहे,' अशा शब्दांत प्रशंसा केली. माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील गंमतीजमती, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आर. पी. बागवे हायस्कूलने लावलेली शिस्त यामुळेच आम्ही आज आयुष्यात यशस्वी होऊ शकलो अशी कृतज्ञता व्यक्त केली.


​या स्नेहसंमेलनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, पुणे व विविध भागांतून २००३ - २००४ बॅचचे अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी संस्था पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब

लोकप्रिय टॅग्स