ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात ५००० वृक्ष लागवड मोहिम.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात ५००० वृक्ष लागवड मोहिम.

युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात ५००० वृक्ष लागवड मोहिम.

Article image


माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ.

Article image


कुडाळ | ब्यूरो न्यूज : युवासेना प्रमुख तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रतिनिधी आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेना कुडाळ यांच्या वतीने आणि युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या पुढाकाराने कुडाळ शहरात ५००० झाडांची भव्य वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. याचा शुभारंभ माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी मंदिर येथे वृक्षारोपण करून करण्यात आला. यामध्ये बेल, आवळा, जरूळ, करंज, महोगनी, शेवगा, बहवा, चिंच, कुसुमी, कांचन, पळस यांसारखी झाडे लावण्यात येत आहेत. कुडाळ शहरातील भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि वाढते प्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.


     

याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख, नगरसेवक मंदार शिरसाट, शिवसेना तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवतीसेना जिल्हाप्रमुख नीनाक्षी शिंदे, जि. प. सदस्य गंगाराम सडवेलकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, कुडाळ संपर्कप्रमुख अतुल बंगे, युवासेना उपतालुकाप्रमुख स्वप्निल शिंदे, उपशहर प्रमुख गुरु गडकर, शहर निरीक्षक सुशिल चिंदरकर,युवासेना शहर समन्वयक अमित राणे, उपशहर प्रमुख शैलेश काळप, शाखाप्रमुख पप्या धुरी, संतोष अडुळकर, विनय पालकर, केदार काळप, महेश राहुल, प्रकाश कांबळे, हर्षद काळप, संजय बोभाटे, महेश कांबळे, जेष्ठ नागरिक भाऊ पाटणकर, प्रथमेश राणे, सतीश कुडाळकर, नितीन सावंत, वकिल शिवप्रसाद सामंत व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स