ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक.

Article image

सर्व नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना कामांच्या गतीत वाढ करून प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश.

Article image


विकासकामांची गुणवत्ता, निधीचा प्रभावी वापर आणि योजनांची वेळेत पूर्तता यावर भर देत जिल्हाधिकाऱ्यांच्या विविध विभागांना 'महत्त्वपूर्ण' सूचना.



सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) योजनेची आढावा बैठक संपन्न झाली.

विकासकामांची गुणवत्ता, निधीचा प्रभावी वापर आणि योजनांची वेळेत पूर्तता यावर भर देत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.


बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी सन २०२५ - २६ या आर्थिक वर्षातील विविध योजनांचा योजना निहाय तसेच कामनिहाय सविस्तर आढावा घेतला. प्रलंबित व अपूर्ण कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करून दायित्व निधी मागणी करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. विकासकामांमध्ये कोणताही विलंब होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.


जिल्हा परिषद सिंधुदुर्गमार्फत विविध योजनांतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेताना जिल्हाधिकाऱ्यांनी ही कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. 


नगर विकास विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेताना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना कामांच्या गतीत वाढ करून प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. शहरी भागातील पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकासकामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


यावेळी सर्व विभागांनी आगामी वर्षासाठी योजनांचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, जेणेकरून विकास प्रक्रियेला अधिक वेग देता येईल, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कामांचा सविस्तर आढावा घेऊन निधीचा उद्देशपूर्ण वापर आणि लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन केले.


जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या ‘सिंधुरत्न समृद्ध योजना’ अंतर्गत सुरू असलेल्या कामांचाही त्यांनी आढावा घेतला. ही कामे प्राधान्याने पूर्ण करून नागरिकांना त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.


बैठकीच्या प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांनी विविध योजनांची प्रगती, निधी खर्च, प्रलंबित कामे आणि आगामी नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.


या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आर...

14 Sep 2026 441
श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नि...

14 Sep 2026 208

लोकप्रिय टॅग्स