ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
४१ व्या युथ स्टेट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने मुले आणि मुलींच्या संघांचा सहभाग.

४१ व्या युथ स्टेट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने मुले आणि मुलींच्या संघांचा सहभाग.

४१ व्या युथ स्टेट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने मुले आणि मुलींच्या संघांचा सहभाग.

Article image

सिंधुदुर्ग जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ यांचे निवड चाचणीसाठी खेळाडूंच्या नांव नोंदणीचे आवाहन. 


छत्रपती संभाजीनगर येथील आगामी स्पर्धेच्या निवड चाचणी निकषांबाबत सिंधुदुर्ग जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव अजय शिंदे यांची 'विशेष' माहिती. 


मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या 'सीएम चषक' ह्या ४१ व्या युथ स्टेट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेबाबत सिंधुदुर्ग जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ यांनी इच्छुक खेळाडूंसाठी नांव नोंदणीचे आवाहन केले असून जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव अजय शिंदे यांनी विशेष माहिती दिली आहे. 



या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा असोसिएशनच्या वतीने मुलांचा आणि मुलींचा संघ सहभागी होणार आहे. या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा संघ निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ज्या खेळाडूंचा जन्म ०१ जानेवारी २०१० किंवा त्यानंतर झालेला आहे, तेच खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र असतील असे अजय शिंदे यांनी विशेष अधोरेखित केले आहे. 

 

इच्छुक खेळाडूंची नोंदणी ही शुक्रवार, दिनांक १२ जून २०२६ पर्यंत नोंदणी अनिवार्य आहे. संपर्क व नाव नोंदणीसाठी खेळाडूंनी सिंधुदुर्ग जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव अजय शिंदे यांच्याशी 9422394186 या क्रमांकावर संपर्क साधता येऊ शकतो.


नाव नोंदणी केलेल्या सर्व पात्र खेळाडूंची मैदानावर शारीरिक आणि कौशल्य चाचणी घेतली जाईल. या चाचणीतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारेच अंतिम सिंधुदुर्ग जिल्हा संघ (मुले व मुली) निवडला जाणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या निवड चाचणीसाठी आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ यांनी केले आहे.


मुख्य राज्यस्तरीय स्पर्धा २३ जून ते २८ जून २०२६ या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे खेळवली जाणार आहे असे सचिव अजय शिंदे यांनी कळविले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स