ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
'फाॅर्च्युनचं' वर्धन ; युवा व्यावसायिक मृणाली शिंदे वाढदिवस विशेष.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'फाॅर्च्युनचं' वर्धन ; युवा व्यावसायिक मृणाली शिंदे वाढदिवस विशेष.

'फाॅर्च्युनचं' वर्धन ; युवा व्यावसायिक मृणाली शिंदे वाढदिवस विशेष. 

Article image


विशेष : मालवण शहरातील भरड येथील रामेश्वर काॅम्प्लेक्स मधल्या 'सुनंदा फ्रोजन फाॅर्च्युन्स' ह्या आस्थापनाच्या सर्वेसर्वा मृणाली शिंदे यांचा आज ८ जून रोजी वाढदिवस....! मृणाली यांनी  मालवण शहरच्या सुप्रसिद्ध भंडारी हायस्कूलच्या शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन 'शैक्षणिक संस्कार क्षेत्रात' बालवाडी ते बारावी असे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, आचरा काॅलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज इथे व्यवस्थापन अध्ययनाची पदवी प्राप्त केली. 


मृणाली यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती. मृणाली यांच्या पालकांना, त्यांच्यातील सुविद्येच्या आसक्तीची संपूर्ण कल्पना होती. त्यांच्या पालकांनी शिक्षण, संस्कार व पाल्यांची प्रसन्नता यासाठी यथाशक्ती प्रयत्न देखिल केलेले होते. मृणाली यांना पुढच्या शिक्षणाला थोड्याफार स्वकमाईची जोड लागणार अशी जाणीव झाली आणि बारावीनंतर त्या अनुषंगाने त्यांनी स्वतःहून सक्रीय प्रयत्न केले आणि पुणे येथील डाॅ. डि. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेतून एम. बी. ए. पूर्ण केले.

त्यानंतर मालवणच्या एका नूतन आस्थापनात त्यांनी व्यावसायिक व व्यावहारिक जबाबदारी ह्यांचा एका नोकरीद्वारे प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्या अनुभवासाठी त्या संबंधीत आस्थापक तथा मालकांबद्दल सदैव ॠणी असतात.



मालवण शहरच्या एका उच्च शिक्षित युवतीचा हा शिक्षण ते व्यवसाय असा मालवण शहरातच राहून केलेला छोटेखानी प्रवास आहे. त्यांचे 'सुनंदा फ्रोजन फाॅर्च्युन्स' हे आस्थापन सुद्धा अत्यंत कोवळ्या व्यावसायिक अवस्थेत आहे आणि युवा व्यावसायिक मृणाली शिंदे ह्या त्याच कोवळीकीला आवश्यक सक्षम व्यावसायिक जाणीवांना समर्पित जीवन जगायची 'व्यापारी शैली' विकसीत करत आहेत. आधुनिकतेसोबत मालवण शहरातील लोकांचा आदर, आस्था यांना त्या सर्वतोपरी प्राधान्य देतात तसेच लोकांच्या सोबत वावरताना स्वतःच्या दृष्टीची वास्तविकता व सात्विकता जपायचाही त्या आवर्जून प्रयत्न करत असतात.


ह्या सर्व प्रवासात ऑगस्ट २०२१ पासून, मृणाली शिंदे यांची 'आपली सिंधुनगरी न्यूज समूहाच्या कार्यकारी संस्थापक घटक' म्हणून सेवा तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या 'प्रिमिअम ॲन्कर' म्हणून होणारे योगदान हे घटक त्यांच्यातील सुविद्य जाणिवांचा एक प्रसन्न अविष्कार आहेत. 


आपली सिंधुनगरी न्यूज समूहाच्या वतीने, मृणाली शिंदे यांच्या वाढदिवसाबद्दल व पुढील  सर्वांगीण वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या जात आहेत.



सानिका वायंगणकर ( प्रमुख संपादन सहाय्यक व प्रसिद्धी प्रमुख , आपली सिंधुनगरी न्यूज)

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स