मालोंड माळ येथे २ मे रोजी बैलगाडा शर्यत.
मालोंड माळ येथे २ मे रोजी बैलगाडा शर्यत.
चुनवरे गावचे सुपुत्र राकेश परब आणि मित्र मंडळ यांच्यावतीने आयोजित स्पर्धेचे दुसरे वर्ष.
पोईप : प्रतिनिधी मालवण तालुक्यातील चुनवरे गावचे सुपुत्र राकेश परब आणि मित्र मंडळ यांच्या वतीने दुसऱ्या वर्षीही २ मे रोजी दुपारी २ वाजता, मालोंड माळ येथे राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्याला रुपये ३५०००/व मानाची ढाल, द्वितीय रुपये २५०००/ व मानाची ढाल,तर तृतीय क्रमांक रुपये २००००/ आणि मानाची ढाल , चतुर्थ रुपये १७०००/ व मानाची ढाल या प्रमाणे रोख बक्षीसे दिली जाणार आहेत, तर अनुक्रमे ५ ते पंधरा पर्यंतच्या विजेत्यांना अनुक्रमे रुपये १५०००/, १२०००/, १००००/, ८०००/ ,७०००/, ५०००/ व पुढील सर्वांना प्रत्येकी रुपये २०००/ व सर्व विजेत्यांना मानाची ढाल प्रदान करण्यात येणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांचे श्री. राकेश परब हे स्वीय सहाय्यक आहेत.
या बैलगाडा शर्यतीचे खास आकर्षण म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल स्थानी असलेल्या बकासुराला पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे तरी या बैलगाडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी , दया देसाई (९४०४३९६२००), संतोष मुणगेकर (७०२०६६४७३४) यांच्याशी संपर्क करून नोंदणी करावी अशी माहिती मिळत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)