ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
श्री देव नारायण मंदिरात श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्याचा दुसरा दिवस 'अरणी मंथनासह' उत्साहात.

श्री देव नारायण मंदिरात श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्याचा दुसरा दिवस 'अरणी मंथनासह' उत्साहात.

श्री देव नारायण मंदिरात श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्याचा दुसरा दिवस 'अरणी मंथनासह' उत्साहात.


Article image


मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या देऊळवाडा येथील श्री देव नारायण मंदिरात, अधिक मासानिमित्त आणि जनकल्याणार्थ श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्याचा दुसरा दिवस  अरणी मंथनासह विविध धार्मिक विधी व कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्या अंतर्गत आज सकाळच्या सत्रापासून श्रीमद् भागवत महापुराणाचे संस्कृतमध्ये वाचन (संहिता वाचन), श्री विष्णू देवतेस सहस्र तुलसीदल अर्पण पूजाविधी, सुवासिनींच्या हस्ते सहस्र नामावलीसहीत देवीला कुंकूमार्चन तसंच आयोजकांकडून ५ वर्षे ते ९ वर्षे या वयोगटातील कुमारिका पूजन संपन्न झाले. हे सर्व विधी 'संपूर्णपणे निःशुल्क' होते.

Article image


श्री देव नारायण मंदिर प्रांगणात उभारण्यात आलेल्या यज्ञकुटीत विधीवत यज्ञ विधी संपन्न झाले. होम हवन सुरू होण्यापूर्वी पारंपरिक वैदिक व नैसर्गिक अशा 'अरणी मंथन' पद्धतीने अग्नी उत्पन्न करण्यात आला. सर्व धार्मिक विधींचे यजमानपद श्री देव नारायण मंदिरचे ज्येष्ठ पुरोहित सुमेध जोशी व त्यांची पत्नी सौ. मनिषा जोशी या दांपत्याने भूषविले. 


दुसर्या दिवशी धार्मिक विधींचे पौरोहित्य श्री. किशोर जोशी, श्री. गणेश उर्फ राजू जोशी, श्री. कार्तिकेय जोशी, श्री. योगेश जोशी, श्री. योगेश लेले, श्री. गिरीश मुंडले यांनी केले. यावेळी मालवणच्या श्री देव नारायण मंदिरचे ज्येष्ठ पुरोहीत श्री. सुमेध जोशी त्यांची पत्नी सौ. मनिषा जोशी या दांपत्याने यजमानपद भूषवले. श्रीमद् भागवत सप्ताह सोहळयाचा संकल्प आणि विविध धार्मिक विधींसह आरतीने पहिल्या दिवसाच्या प्रथम सत्राची सांगता झाली.


द्वितीय सत्र.

 

दुसर्या सत्रात भगवत भक्त व श्रोते यांच्यासाठी सुप्रसिद्ध निरुपणकार श्री. प्रणव गोखले यांच्या श्रीमद् भागवत महापुराणातील कृष्णलीलांचे मराठीतून निरूपण या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. निरूपणकार प्रणव गोखले यांचे विधिवत स्वागत करण्यात आले.


निरुपणकार श्री. प्रणव गोखले यांनी श्रीमद् भागवताची जाण, जाणीव आणि त्याकडे पहायच्या अध्यात्मिक दृष्टीकोनांचे विवेचन केले. निरुपणकार प्रणव गोखले यांनी, महद् आकाश, जीव आकाश, भूत आकाश, मठ आकाश व घट आकाश असे पाच आकाश व दहर आकाश यांची विवेचनाद्वारे माहिती देऊन त्यांची भागवत दृष्ट्या उकल केली. भगवतांच्या २४ अवतारांची ओळख तसेच भगवंताच्या अंशांची मानवी रुपात झालेली व होत जाणारी ओळख त्यांनी समजावली.


श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्यात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक भगवत भक्त व सहकारी संचाच्या वतीने करण्यात आले असून या सोहळ्याच्या अधिक माहितीसाठी पुरोहित श्री. सचिन वझे (9422435395), सौ. प्रीती वैद्य, (9405930122), श्री. गजानन अभ्यंकर ( 9420728752) व सौ. शुभदा अभ्यंकर ( 9423053014) यांच्याशी संपर्क साधता येऊ शकतो. 


मालवण ग्रामदैवत श्री. देव नारायण मंदिर येथील या सोहळ्याच्या दिवशी मालवणच्या प्रथम नागरीक सौ. ममता वराडकर तसेच देवस्थान संबंधित विश्वस्त, मालवण व परिसरातील पुरोहित , ब्रम्हवृंद, मान्यवर, गांवकर मंडळी, देऊळवाडा व मालवणवासिय यांचे सौजन्य सहकार्य आणि बाळगोपाळ मंडळींचा उत्स्फूर्त सहभाग आणि उपस्थिती लाभली. 


आज, भागवत सप्ताह सोहळ्याच्या दुसर्या दिवशी श्री देव नारायण मंदिर प्रांगणात उभारण्यात आलेल्या यज्ञकुटीतील होमाच्या पार्श्वभूमीवर निसर्गातील तत्वांच्या सहाय्याने अग्नी उत्पन्न करण्यासाठी अरणी मंथन ही वैदिक काळापासून चालत आलेली एक प्राचीन पद्धत वापरली गेली. यात लाकडाचे घर्षण म्हणजेच मंथन करून पवित्र अग्नी प्रज्वलित केला गेला. प्राचीन यज्ञ आणि धार्मिक विधींमध्ये याच अग्नीचा वापर केला जातो. या प्रक्रियेत दोन लाकडी तुकड्यांचा वापर केला जातो. खालचे सपाट लाकूड म्हणजे 'अधरा' आणि वरून घासल्या जाणारी लाकडी कांडी म्हणजे 'उत्तरा' किंवा मथनी असे असते. सामान्यतः शमी आणि पिंपळाच्या लाकडाचा वापर यासाठी केला जातो. यासाठी आधी एका लाकडी फळीवर छिद्र केलं गेले आणि त्यात दुसरी कांडी लाकडी दोरीच्या साहाय्याने अत्यंत वेगाने फिरवली गेली. सततच्या घर्षणामुळे निर्माण झालेल्या उष्णतेने बारीक ठिणगी तयार झाली आणि त्या ठिणगीला प्राणवायू साठी झोका देत देत प्रज्वलित केला गेला. भारतीय संस्कृतीनुसार, अरणी मंथन केवळ अग्नी पेटवण्याचे साधन नाही, तर ते मानवी जीवनातील संयम आणि साधनेचे प्रतीक आहे. दोन लाकडांच्या घर्षणामुळे अग्नी प्रकट होतो, त्याचप्रमाणे सततच्या परिश्रमाने आणि प्रयत्नाने मनुष्याच्या अंतःकरणात ज्ञान व ऊर्जेचा प्रकाश जागृत होतो.

Article image


निरुपणकार प्रणव गोखले यांच्या दुसर्या दिवशीच्या निरुपणादरम्यान विवेचनाद्वारे अनेक ज्ञात अज्ञात घटक व स्थितींचे मंथन झाले आणि मानवी जीवनातल्या अनेक विषय, विकार, वस्तूंची ओळख घेताना 'परीक्षीत' जाणीवेची तत्व ओळख झाली आणि ज्ञान यज्ञाच्या आरंभापूर्वी श्रीमद् भागवत जागराची अध्यात्मिक ठिणगी पडली अशी प्रतिक्रिया उपस्थित भगवत भक्त, भाविक, श्रोते व मालवणवासियांनी व्यक्त केली आहे. दुसर्या दिवशीच्या निरुपणा दरम्यान एका उदाहरण देताना

निरुपणकार प्रणव गोखले यांनी संकलक व संपादक ही भूमिका तत्वं समजावून सांगितली आणि त्यातून 'निष्कर्ष' विषयावर विशेष विवेचन देखिल केले .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 16
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 323

लोकप्रिय टॅग्स