सिंधुदुर्ग जिल्हा काॅंग्रेस कमिटी अध्यक्षपदी अरविंद मोंडकर.
सिंधुदुर्ग जिल्हा काॅंग्रेस कमिटी अध्यक्षपदी अरविंद मोंडकर.
मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हा काॅंग्रेस कमिटी अध्यक्षपदी अरविंद मोंडकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने संघटन सृजन अभियान अंतर्गत विविध जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या असून राज्यातील विविध जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष नेमण्यात आले आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी अरविंद मोंडकर यांची देखील निवड करण्यात आली आहे.
याबाबतचे पत्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांच्या सहीने पाठविण्यात आले आहे. लोकशाही आणि संविधान मजबूत करण्यासाठी सर्वमान्य असे गांधी – नेहरू यांचे विचार दृढ करण्यासाठी आणि महाराष्ट्राचा पुरोगामी वारसा जपण्यासाठी येणाऱ्या काळात अधिक जोमाने काम करण्याची संधी पक्ष नेतृत्वाने दिली. तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विश्वास दाखवला यासाठी आभार मानत सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसमय करण्याचा प्रयत्न राहील, असे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी नवनियुक्त अध्यक्ष अरविंद नामदेव मोंडकर यांनी सांगितले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)