ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
समाजात शांतता, सहिष्णुता आणि परस्पर विश्वास टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागण्याची गरज : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

समाजात शांतता, सहिष्णुता आणि परस्पर विश्वास टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागण्याची गरज : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

समाजात शांतता, सहिष्णुता आणि परस्पर विश्वास टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागण्याची गरज : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे


Article image


जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा.

Article image


राष्ट्रीय एकात्मता आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित करत चुकीच्या माहितीपासून सावध रहाणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे मार्गदर्शनपर आवाहन.

Article image


सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात एकजूट राहण्याची शपथ घेत समाजात शांतता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, दहशतवाद ही मानवतेसाठी अत्यंत घातक प्रवृत्ती असून त्याचे परिणाम संपूर्ण समाजावर होतात. समाज माध्यमांमध्ये समाजविघातक विचार पसरविण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सजग राहून चुकीच्या माहितीपासून सावध राहणे आवश्यक आहे. समाजात शांतता, सहिष्णुता आणि परस्पर विश्वास टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. युवकांनी सामाजिक माध्यमांचा सकारात्मक वापर करावा तसेच देशविघातक आणि हिंसक प्रवृत्तींना वेळीच रोखावे. राष्ट्रीय एकात्मता आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Article image

यानंतर जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली. कार्यक्रमात दहशतवादमुक्त, शांततामय आणि सुरक्षित समाज निर्मितीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, आरती देसाई, प्रतिभा वराळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स