'कृषी मित्र' शेतकरी गटाची विषमुक्त शेतीकडे यशस्वी वाटचाल.
'कृषी मित्र' शेतकरी गटाची विषमुक्त शेतीकडे यशस्वी वाटचाल.
फार्मर कप २०२६ अंतर्गत दशपर्णी अर्काची निर्मिती
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नाटळ येथील कृषीमित्र शेतकरी गटाने विषमुक्त शेतीकडे एक आश्वासक पाऊल टाकले आहे. 'फार्मर कप २०२६' अंतर्गत या गटातील शेतकऱ्यांनी एकत्र येत 'दशपर्णी अर्क' तयार केला.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे रात्री १० वाजता कणकवलीचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री. उमाकांत पाटील यांनी याठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी शेतकऱ्यांना फार्मर कप २०२६ स्पर्धेच्या अनुषंगाने एकत्रित निविष्ठा खरेदी, शेतीच्या आधुनिक व सुधारीत पद्धती, तसेच विषमुक्त शेतीचे महत्त्व आणि त्याचे होणारे फायदे याविषयी सविस्तर व मोलाचे मार्गदर्शन केले. शेतकरी गटाने 'स्मार्ट शेती ॲप'मध्ये देखील या दशपर्णी अर्क उपक्रमाची यशस्वी नोंद केली आहे. या अचूक नोंदीमुळे गटाला तब्बल अडीच गुण मिळाले आहेत.
या यशामुळे शेतकऱ्यांमधील उत्साह द्विगुणित झाला असून, या गटाची विषमुक्त आणि शाश्वत शेतीच्या दिशेने होणारी वाटचाल दिशादर्शक ठरेल अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)