ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मालवण शहरातील श्री देव नारायण मंदिरात २४ मे पासून श्रीमद् भागवत सप्ताह सोहळा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण शहरातील श्री देव नारायण मंदिरात २४ मे पासून श्रीमद् भागवत सप्ताह सोहळा.

मालवण शहरातील श्री देव नारायण मंदिरात २४ मे पासून श्रीमद् भागवत सप्ताह सोहळा.


मालवण : मालवण शहरातील देऊळवाडा येथील श्री देव नारायण मंदिरात अधिक मासानिमित्त आणि जनकल्याणार्थ श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २४ मे २०२६ ते रविवार, ३१ मे २०२६ या कालावधीत हा सप्ताह सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. 

Article image


या सोहळ्या अंतर्गत दररोज सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत, श्रीमद् भागवत महापुराणाचे संस्कृतमध्ये वाचन (संहिता वाचन), श्री विष्णू देवतेस सहस्र तुलसीदल अर्पण पूजाविधी, सुवासिनींच्या हस्ते सहस्र नामावलीसहीत देवीला कुंकूमार्चन तसंच आयोजकांकडून ५ वर्षे ते ९ वर्षे या वयोगटातील कुमारिका पूजन संपन्न होणार आहेत. हे सर्व विधी 'संपूर्णपणे निःशुल्क' असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे. 


पुणे येथील सुप्रसिद्ध निरुपणकार श्री. प्रणव गोखले यांचे संध्याकाळी ४:३० ते ८:३० या वेळेत श्रीमद् भागवत महापुराणातील कृष्णलीलांचे मराठीतून निरूपण होईल.


सोमवार, १ जून २०२६ रोजी मूर्ती विसर्जन मिरवणुकीने सोहळ्याची सांगता होणार आहे. 


या श्रीमद् भागवत सप्ताह सोहळ्यात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री. सचिन वझे (9422435395), सौ. प्रीती वैद्य (9405930122), श्री. गजानन अभ्यंकर ( 9420728752) व सौ. शुभदा अभ्यंकर ( 9423053014) यांनी केले आहे. श्री. देव नारायण मंदिराचे नित्य पुरोहीत श्री. सुमेध जोशी यांचे या सोहळ्याला सक्रीय योगदान आहे.


या सोहळ्याला मालवण ग्रामदेवतांचे आशीर्वाद, देवस्थान संबंधित विश्वस्त, मान्यवर, समस्त गांवकर मंडळी यांचे सौजन्य सहकार्य आणि बाळगोपाळ मंडळींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन.

लोकप्रिय टॅग्स