ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मालवण नगरपरिषदच्या वतीने आयोजित स्वच्छता मोहिम उत्साहात.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण नगरपरिषदच्या वतीने आयोजित स्वच्छता मोहिम उत्साहात.

मालवण नगरपरिषदच्या वतीने आयोजित स्वच्छता मोहिम उत्साहात. 

Article image

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण नगरपरिषदच्या वतीने स्वच्छ मालवण, सुंदर मालवण या संकल्पनेतून आणि पर्यावरण संवर्धन व जनजागृती या दृष्टीकोनातून स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. १२ मे रोजी चिवला बीच येथे ही मोहीम संपन्न झाली. मालवण नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक व विविध सामाजिक संस्था यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.


यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले की, तीन ट्रॅक्टर कचरा गोळा करण्यात आला. यात प्लास्टिक बॉटल व प्लास्टिक कचरा याचा समावेश अधिक होता तरीही प्लस्टिक मुक्त मालवण शहर या संकल्पनेनुसार शहरात प्लास्टिक कचरा होणार नाही याची काळजी सर्वांनी घेऊया असे आवाहन नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी केले. स्वच्छ मालवण, सुंदर मालवण या संकल्पनेतून सातत्याने मालवण शहारात विशेष स्वच्छता मोहीम विविध ठिकाणी तसेच किनारपट्टी भागात आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी दिली.


यावेळी मुख्याधिकारी प्रतीक थोरात, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेविका महानंदा खानोलकर, नगरसेविका दर्शना कासवकर, नगरसेविका शर्वरी पाटकर, नगरसेविका मेघा सावंत, भाग्यश्री मयेकर यांसह लायन्स क्लब अध्यक्ष अनुष्का चव्हाण, बाळू अंधारी, अवधूत चव्हाण, रोटरी क्लब अध्यक्ष पंकज पेडणेकर, प्रसन्न मयेकर, भाई कासवकर, ॲड. ऐश्वर्य मांजरेकर, दिलीप मयेकर, वसंत गांवकर, आबा शिर्सेकर, पुजा खराडे, मनोज मेथर, आशिष पाटील, सौ. पाटील, निकीत वराडकर, संतोष परब यांसह विविध मान्यवर, नागरीक आणि नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स